Senior Citizen Scheme:- गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत व त्यामध्ये बँक आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांना गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जाते हे आपल्याला माहिती आहे. कारण या दोन्ही ठिकाणी जर गुंतवणूक केली तर तुमची गुंतवणूक ही जोखीम मुक्त असते म्हणजेच यामध्ये पैसे बुडण्याचा धोका नसतो आणि त्यातून मिळणारा परतावा देखील उत्तम पद्धतीचा मिळतो.
त्यामुळे जास्त करून पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या विविध योजनांना गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जाते. यामध्ये गेल्या काही वर्षांपासून पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांना गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जात आहे.
पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक विविध आकर्षक अशा एकूण गुंतवणूक योजना राबवल्या जातात व त्यातीलच एक ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली योजना जर बघितली तर ती म्हणजे पोस्ट ऑफिस जेष्ठ नागरिक बचत योजना होय.
ही अतिशय फायद्याची अशी एक योजना असून या योजनेमध्ये जेष्ठ नागरिकांच्या नावे खाते उघडून तुम्हाला एक हजार रुपयांपासून ते तीस लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येणे शक्य आहे. याच योजनेची थोडक्यात माहिती या लेखात बघू.
पोस्टाची ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे फायद्याची
पोस्ट ऑफिसच्या विविध योजना बघितल्या तर यामध्ये पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही अतिशय फायद्याची योजना असून या योजनेमध्ये केलेली गुंतवणूक ही जोखीम मुक्त असते व परतावा देखील चांगला मिळतो.
या योजनेत किमान एक हजार रुपयांपासून ते तीस लाख रुपयापर्यंतची रक्कम गुंतवता येते. या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना वार्षिक 8.2 टक्के दराने व्याज दिले जाते. या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना पाच वर्षाच्या कालावधीपर्यंत गुंतवणूक करता येणे शक्य आहे व ही
एक पोस्टाची उत्तम अशी बचत योजना आहे.
तीस लाखाच्या गुंतवणुकीवर मिळेल पाच वर्षात बारा लाख तीस हजार रुपये व्याज
पोस्टाच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत तीस लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येणे शक्य आहे. यामध्ये जर गुंतवणूकदारांनी जेष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केली तर त्यांना पाच वर्षात बारा लाख तीस हजार रुपये व्याज मिळते व पाच वर्षांनी गुंतवणूक केलेली तीस लाख आणि त्यावर मिळणारे व्याज मिळून तुम्हाला एकत्रित 42 लाख तीस हजार रुपयांचा निधी मिळतो.
अशा पद्धतीने अगदी कमी कालावधीत तुम्ही जास्त व्याजदरामुळे अधिक व्याजाचा फायदा या योजनेतून मिळवू शकतात. त्यामुळे तुमच्या घरात जर ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या नावाने गुंतवणूक करून तुम्ही जास्त व्याजाचा फायदा या योजनेतून मिळू शकतात.
मिळतो कर बचतीचा फायदा
तुम्ही या पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये गुंतवणूक केली तर त्यावर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर बचतीचा फायदा देखील घेता येतो व या कायद्यांतर्गत करदात्यांना साधारणपणे दीड लाख रुपयांपर्यंतचा फायदा कर बचतीच्या रूपाने मिळतो.
काय आहे या योजनेसाठी पात्रता?
या योजनेमध्ये ज्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायची असेल अशा कोणत्याही व्यक्तीचे वय साठ वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच जे व्यक्ती संरक्षण किंवा सरकारी क्षेत्रातून व्हीआरएस घेतात. त्यांना देखील काही अटीनुसार वयात सूट दिली जाते व त्यानंतर हे लोक या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
योजनेच्या पाच वर्षांनी मुदत वाढ घेता येते
समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला या योजनेचे पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर देखील गुंतवणूक वाढवायची असेल तर त्याला मुदतवाढ मिळू शकते.
अशा प्रकारचा मुदत वाढीचा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर या योजनेचा पाच वर्षाचा कालावधी म्हणजेच ही योजना मॅच्युरिटी होण्याच्या एक वर्षाच्या आत घ्यावा लागतो.
कशा पद्धतीने कराल या योजनेत गुंतवणूक?
या योजनेतील गुंतवणूक सुरू करायची असेल तर कोणतेही ज्येष्ठ नागरिक बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडू शकतात.
तसेच हवे असेल तर पत्नी सोबत जॉइंट अकाउंट देखील या माध्यमातून करता येते व सिंगल खाते देखील उघडता येते. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर कुठल्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय फायद्याची अशी ही योजना आहे.