पोस्टाच्या ‘या’ योजनेतील प्रतिमाह 1000 रुपयांची गुंतवणूक देईल तुम्हाला 8 लाख; परंतु कशी करावी लागेल प्लॅनिंग?

Ajay Patil
Published:
ppf scheme

गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून एकदा बँकांच्या मुदत ठेव योजना आणि पोस्ट खात्याच्या अनेक अल्पबचत व मुदत ठेव योजनांना खूप मोठ्या प्रमाणावर पसंती देण्यात येत आहे. कारण या दोन्ही गुंतवणूक पर्यायामध्ये पैसे गुंतवल्यानंतर तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि तुम्हाला हमी परतावा देखील मिळतो. याशिवाय तुम्हाला कर सवलती सारखे विशेष सुविधा देखील मिळतात.

यामध्ये पोस्ट ऑफिसच्या देखील आता अनेक लोकप्रिय योजना असून प्रत्येक योजनेचे स्वतःचे असे वैशिष्ट्य आहेत व परताव्याच्या दृष्टिकोनातून देखील त्या लोकप्रिय आहेत. अशाच प्रकारे जर आपण पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉफिडंट फंड अर्थात पीपीएफ ही योजना बघितली तर ती खूप महत्त्वाची अशी योजना आहे

व यामध्ये तुम्ही कमीत कमी पाचशे रुपयांपासून ते जास्तीत जास्त दीड लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकतात. नियमित गुंतवणूक तुम्हाला पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये लाखो रुपयांचा फंड जमा करण्यास मदत करते.

 मुलांच्या भविष्यासाठी पैसे जमा करण्यासाठी होईल फायदा

पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना खूप महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेमध्ये तुम्ही किमान पाचशे ते कमाल दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. या योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्षाचा असून यामध्ये तुम्ही कर सवलतीचा देखील फायदा मिळवू शकतात.

तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्याच्या उज्वल भविष्याकरिता चांगला पैसा जमा करायचा असेल तर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीच्या माध्यमातून या योजनेत पैसा जमा करून लाखो रुपये मिळवू शकतात

सध्या 7.1% दराने या योजनेतील गुंतवणुकीवर व्याज दिले जात आहे. तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर प्रत्येक महिन्याला 1000 रुपये जमा करत राहिले तर त्याला आठ लाखापेक्षा अधिकची रक्कम योजनेच्या परिपक्वता कालावधीत मिळू शकते.

 प्रत्येक महिन्याला एक हजार रुपयांची गुंतवणूक कसे मिळवून देईल तुम्हाला आठ लाख?

तुम्ही तुमच्या मुलाच्या नावे या योजनेत प्रत्येक महिन्याला एक हजार रुपयांची गुंतवणूक केली तर एका वर्षामध्ये तुमचे 12000 रुपये जमा होतात. ही योजना पंधरा वर्षांनी मॅच्युअर म्हणजेच परिपक्व होईल पण तुम्हाला ती प्रत्येक पाच वर्षाच्या ब्लॉगमध्ये दोनदा वाढवणे गरजेचे राहील. म्हणजे तुम्हाला यामध्ये पंचवीस वर्षांपर्यंत गुंतवणूक चालू ठेवणे गरजेचे आहे.

पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला 1000 रुपये गुंतवत गेला तर तुमचे एकूण तीन लाख रुपये जमा होतात. आताचे व्याजदरानुसार म्हणजेच 7.1% या दरानुसार जर तुम्ही बघितले तर तुम्हाला यावर पाच लाख 24 हजार 641 रुपये फक्त व्याजातून मिळतील.

अशाप्रकारे या योजनेच्या मॅच्युरिटी नंतर तुम्हाला आठ लाख 24 हजार 641 रुपये मिळतील. याकरिता फक्त तुम्हाला ही योजना पाच वर्षाच्या ब्लॉकमध्ये दोनदा वाढवणे गरजेचे आहे.

 या योजनेत तीन प्रकारची मिळते सूट

या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला तीन प्रकारची करसुट अर्थात टॅक्स बेनिफिट मिळतो. यामध्ये तुम्हाला दरवर्षी जमा केलेल्या रकमेवर कोणताही कर नाही किंवा मिळणाऱ्या व्याजावर देखील कर आकारला जात नाही. तसेच या योजनेची मुदत संपल्यानंतर तुम्हाला जी काही रक्कम मिळते ती देखील संपूर्णपणे करमुक्त आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe