Vastu Shastra Tips:- वास्तुशास्त्र हे एक असे शास्त्र आहे की यामध्ये घराच्या बांधकामापासून तर घरातील अंतर्गत सजावट तसेच घरामध्ये कुठली वस्तू कुठे ठेवावी कुठल्या वस्तू ठेवू नयेत किंवा घराची एकंदरीत सगळी रचना कशी असावी याबद्दल महत्त्वाची माहिती सांगितलेली असते. कारण वास्तुशास्त्रामध्ये घरातील कुठल्या वस्तूंमुळे कुठल्या गोष्टी होऊ शकतात याचा एक सांगोपांग अभ्यास केलेला आहे.
आपल्याला माहित आहे की आपण घरामध्ये अशा बऱ्याच वस्तू ठेवलेल्या असतात की त्यांचा वापर आपण जास्त प्रमाणामध्ये करत नाहीत. ते बऱ्याच दिवसांपासून आपल्या घरामध्ये ठेवलेले असतात. परंतु जर वास्तुशास्त्रानुसार पाहिले तर अशा वस्तूंचा कळत नकळत परिणाम हा व्यक्तीच्या आयुष्यावर होत असतो. अशा काही गोष्टी घरात ठेवल्यामुळे घराची प्रगती न होता अधोगती सुरू होण्याची शक्यता असते व प्रगतीचे मार्ग देखील बंद होऊ शकतात. यासंबंधीचेच माहिती आपण या लेखात बघू.
घरामध्ये ठेवलेल्या या वस्तू घराच्या प्रगतीला ठरतात बाधक
1- घरात ठेवलेले बंद कुलूप– कुलूप म्हटले म्हणजे आपल्या घराला लॉक करण्यासाठी आपण त्याचा प्रामुख्याने वापर करत असतो. बऱ्याचदा काही कारणास्तव कुलूप खराब होते. परंतु तरीदेखील आपण असे खराब व जुनी झालेली कुलपे घरामध्ये ठेवलेली असतात. अशा कुलपांना बऱ्याचदा गंज लागलेला आपल्याला दिसून येतो. तसेच काही कारणांमुळे कुलूप काही कारणांमुळे उघडतही नाहीत आणि बंद ही होत नाही.
अशा स्वरूपाचे बऱ्याचदा कुलपे आपल्या घरात असतात. परंतु अशा प्रकारचे कुलपे घरात ठेवणे हे वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही. अशा प्रकारचे बंद कुलपे ही तुमच्या प्रगतीमध्ये आणि करिअरमध्ये अडथळा आणू शकतात.
एवढेच नाही तर अशी खराब झालेली कुलपे घरात ठेवल्यामुळे मुला मुलींच्या लग्नामध्ये देखील अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते व लग्न ठरायला देखील वेळ लागू शकतो.अशा प्रकारचे बंद झालेली आणि जुने कुलपे नशिबाचे टाळे बंद करू शकते आयत्या चालून आलेल्या संधी देखील माघारी लावण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे बंद कुलूप चुकून देखील घरामध्ये ठेवू नये.
घरामध्ये चांगले वातावरण आणि चांगले आरोग्य राहण्यासाठी या आहेत वास्तु टिप्स
1- वास्तुशास्त्रानुसार जुन्या आणि निरुपयोगी वस्तू बेडरूम मध्ये ठेवू नये.
2- जुने शूज तसेच जुन्या चपल्या जर घरामध्ये असतील तर त्यांना ताबडतोब घराच्या बाहेर ठेवावे किंवा फेकावे.
3- घरातील बेडरूमच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. बेडरूम मधील बेड जर अस्वच्छ असेल तर त्याचा विपरीत परिणाम हा मानसिक आरोग्यावर होत असतो.
4- तसेच घरामध्ये जर बंद पडलेला नळ असेल तर तो त्वरित दुरुस्त करून घ्यावा.कारण नळातून टपकणारे जे पाण्याचे थेंब असतात ते अशुभ मानले जातात.
5- उत्तम आरोग्याकरिता दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे डोकं ठेवून झोपणे हे वास्तुशास्त्रामध्ये फायदेशीर मानले जाते मानसिक तणाव दूर होण्यास मदत करते.
6- वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घराच्या जो काही उंबरा असतो त्याच्या जवळ जास्त कचरा जमा होऊ देऊ नये. उंबऱ्या जवळ कचरा जमा होत असेल तर त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.
7- घरामध्ये जर पॉझिटिव्ह एनर्जी हवे असेल तर सकाळी आणि संध्याकाळी काही वेळ खिडकी आणि दरवाजे उघडे ठेवावे.
8- तसेच तुमचा ब्लड प्रेशर हाय राहत असेल तर तुम्ही घरामध्ये स्पायडर प्लांट लावणे गरजेचे आहे. कारण स्पायडर प्लांट मुळे तुमच्या सभोवतालची जी काही हवा असते ती स्वच्छ होण्यास मदत होते.
( टीप– वरील माहिती ही वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे व याबद्दल आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा किंवा समर्थन करत नाहीत.)