सध्या इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत असून पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या काही वाढलेल्या किमती आहेत त्या आता परवडत नसल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्यावरण हिताच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे आपल्याला आता कल वाढताना दिसून येत आहे.
एवढेच नाही तर केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलण्यात येत असल्याकारणाने अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक स्कूटर पासून ते इलेक्ट्रिक कार्स उत्पादित केल्या जात आहेत.
त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर जास्तीत जास्त वाढेल हे मात्र निश्चित. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचा देखील इलेक्ट्रिक कार घ्यायचा प्लॅनिंग असेल तर काही न करता थोडा संयम ठेवणे गरजेचे असून येणाऱ्या काही महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक चांगली मॉडेल्स येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
म्हणजे हे मॉडेल भारतातील प्रसिद्ध कार उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
कार मार्केट गाजवायला लवकरच दाखल होतील या इलेक्ट्रिक कार
1- टाटाची Curvv EV- टाटाची ही महत्वपूर्ण अशी इलेक्ट्रिक कार 7 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार असून या कारमध्ये अनेक भन्नाट वैशिष्ट्ये कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत.
जर आपण या कारची रेंज पाहिली तर अशी अपेक्षा आहे की एका चार्जवर ही सहाशे किलोमीटर पेक्षा जास्तची रेंज देऊ शकेल. टाटाची पहिली मिडसाईज इलेक्ट्रिक एसयूव्ही असून या कारमध्ये 12.3 इंच टचस्क्रीन डिस्प्ले, डिजिटल क्लस्टर तसेच पॅनोरॅमिक सनरूफ तसेच व्हेंटिलेटर फ्रंट सीट सारखे फीचर्स असणार आहेत.
2- महिंद्रा XUV 3XO EV- साधारणपणे या वर्षाच्या शेवटी शेवटी महिंद्रा ही कार लॉन्च करण्याची अपेक्षा असून या कारची प्रमुख स्पर्धा ही टाटा पंच EV शी असेल.
या कारमध्ये बॅटरी पॅकसह XUV चारशे बरोबर अनेक समानता केली जाईल व ही कार एका चार्जेवर सुमारे 350 ते 400 किमीची रेंज ऑफर करेल अशी अपेक्षा आहे.
3- मारुती सुझुकी eVX- मारुती सुझुकी च्या माध्यमातून मारुती सुझुकी eVX सादर केली जाणार आहे व साधारणपणे 2025 या वर्षाच्या सुरुवातीला किंवा मध्यंतरी ही सादर होईल अशी अपेक्षा आहे. या कारमध्ये 60 KWh बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो व ही कार 550 किलोमीटर पेक्षा जास्त रेंज देऊ शकते.
4- ह्युंदाई क्रेटा EV- ही कार अनेक टेस्टिंग दरम्यान दिसलेली असून येणाऱ्या वर्षाच्या सुरुवातीला शोरूम मध्ये दाखल होईल अशी शक्यता असून यामध्ये बेस स्पेक कोना इलेक्ट्रिकची इलेक्ट्रिक मोटर असण्याची शक्यता आहे
व त्याची डिझाईन ICE Creta द्वारे प्रेरित असेल व हिची रेंज 450 किलोमीटर पेक्षा जास्त असेल अशी अपेक्षा आहे.
5- महिंद्रा XUV.e8- साधारणपणे ही कार डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च होऊ शकते व साधारणपणे पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाही म्हणजेच 2025 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
XUV 700 ICE वर आधारित असलेली ही इलेक्ट्रिक एसयूव्ही डिझाईनच्या बाबतीत जवळजवळ कॉन्सेप्टच्या बरोबरीची असेल. या कारच्या इंटेरियर मध्ये 12.3 इंचाचा टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह लेवल 2 ADAS देखील यामध्ये दिला जाईल अशी शक्यता आहे.