Budget Car:- प्रत्येकाला आपली स्वतःची चारचाकी म्हणजेच कार असावी ही तीव्र इच्छा असते व ही इच्छा पूर्ण करण्यासाठी बरेच जण प्रयत्न करत असतात. तसेच आपल्या दररोजच्या कामाच्या ठिकाणी जाण्या-येण्याकरिता देखील आता बरेच जण कारला पसंती देतात व या दृष्टिकोनातून कार खरेदी केली जाते.
या अनुषंगाने तरुणाई आपल्याला खूप पुढे असल्याचे दिसते. आजकालच्या तरुणांनी एकदा शिक्षण पूर्ण केले व ते जॉबला लागले की लगेच कार घेण्याची तयारी करतात. यामध्ये प्रामुख्याने ऑफिसच्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी अशा पद्धतीने कार खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते.
परंतु अशा दररोजच्या कामाच्या ठिकाणी जा-ये करण्याकरिता स्वस्तातली आणि चांगली मायलेज देणारी कार शोधली जाते व अशाच कार या कामासाठी फायद्याच्या ठरतात.
अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील तुमच्या कामाच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी पाच लाखाच्या बजेटमध्ये आणि उत्तम मायलेज देणारी कार हवी असेल तर या लेखामध्ये आपण अशा दोन कारविषयी माहिती बघणार आहोत ज्या कार तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून फायद्याच्या ठरतील.
दररोजच्या कामाच्या ठिकाणी जा-ये करण्यासाठी या कार ठरतील फायद्याच्या
1- रेनो क्विड- ही एक बजेट फ्रेंडली कार असून एक स्टायलिश कार म्हणून देखील लोकप्रिय आहे. या कारमध्ये उत्तम अशी स्पेस मिळते व मायलेजच्या बाबतीत देखील ही उत्कृष्ट अशी कार आहे. मायलेज चांगले असल्यामुळे दैनंदिन वापराकरिता रेनो क्विड ही कार तुम्ही खरेदी करू शकतात.
कंपनीने या कारमध्ये 1.0- लिटर पेट्रोल इंजिन दिले असून जे 68 पीएस पावर आणि 91 एनएमचा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
मायलेज बघितले तर एका लिटरमध्ये ही कार 22 किलोमीटर पर्यंतचे मायलेज देते व पाच लोक आरामात या कारमध्ये बसून प्रवास करू शकतात. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दोन एअर बॅग, डिस्क ब्रेक तसेच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम देखील या कारमध्ये मिळते.
2- मारुती सुझुकी सेलेरिओ- मारुती सुझुकीचे सेलेरिओ ही एक बजेट कार असून आलिशान कार श्रेणीमध्ये येते. या कारची किंमत थोडी जास्त आहे. परंतु ही व्हॅल्यू फॉर मनी अशा टाईपची कार आहे. उत्तम डिझाईन तसेच चांगली स्पेस व उत्तम इंजिन यामुळे ही कार विशेष लोकप्रिय आहे व मायलेजच्या बाबतीत देखील ही कार दमदार आहे.
दैनंदिन वापराकरिता ही कार खरेदी करणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते. कंपनीने या कारमध्ये 1.0- लिटर K10C पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 65 एचपी पावर आणि 89 एनएमचा टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्ससह कनेक्ट आहे.
ही कार 26 किमीचे मायलेज देते व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये डिस्क ब्रेक, EBD सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम तसेच हार्ट रिवर्स पार्किंग सेंसर, दोन एअरबॅग, हिल होल्ड असिस्ट आणि ब्रेक असिस्ट अशी वैशिष्ट्ये दिली आहेत. या कारची किंमत बघितली तर ती एक्स शोरूम पाच लाख 36 हजार रुपयांपासून सुरू होते.