पावसाळ्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर साप, उंदीर आणि घुशीसारख्या प्राण्यांचे मोठ्या प्रमाणावर वावर वाढल्याचे दिसून येते व अगदी घराच्या अवतीभवती किंवा घरात शिरण्याच्या घटना देखील घडतात.
यामध्ये सापांचा प्रादुर्भाव या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. कारण बऱ्याचदा पावसामुळे सापांची बिळे म्हणजेच निवारा नष्ट होतो.प्रसंगी बऱ्याचदा साप निवाऱ्यासाठी किंवा अन्नाच्या शोधासाठी घरांमध्ये देखील शीरतात व अशावेळी अडगळीच्या जागी ते बसून राहतात.
जर चुकून आपला धक्का किंवा पाय सापावर पडला तर मात्र सर्पदंश होऊ शकतो. म्हणून या कालावधीमध्ये आपण खूप काळजी घेणे गरजेचे असते. याकरिता आपण या लेखामध्ये काही उपाय बघणार आहोत त्यामुळे साप घरात असले तरी घराच्या बाहेर निघून जातील किंवा घरात शिरणारच नाहीत.
हे उपाय करा आणि सापांना घरापासून दूर पळवा
1- कार्बोलिक ॲसिडचा वापर– कार्बोलिक ऍसिड हे सापांना घरापासून दूर पळवून लावण्यासाठी एक उत्कृष्ट असा उपाय आहे. हे ऍसिड जर तुम्ही घराभोवती फवारले तर साप घरात येण्याचा धोका कमी होतो किंवा साप घरात येऊ शकत नाही.
2- सल्फर पावडरचा वापर– समजा तुमच्याकडे जर कार्बोलीक ऍसिड नसेल तर तुम्ही सल्फर पावडरचा वापर करू शकता. यामध्ये जर साप घरामध्ये असेल किंवा तो ज्या ठिकाणी फिरत असेल त्या ठिकाणी तुम्ही सल्फर पावडर शिंपडावी. यामुळे साप घरापासून दूर निघून जातो. सल्फर पावडर सापांवर शिंपडल्यास त्याच्या त्वचेवर जळजळ होते व तो दूर जातो.
3- लसणाचा वापर– या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे नसतील तर तुम्ही लसूण पावडर देखील शिंपडू शकतात. याकरिता लसूण बारीक करून घ्यावा व त्यामध्ये मोहरीचे तेल मिसळून दिवसभर ठेवावे. त्यानंतर हे तयार मिश्रण घराभोवती शिंपडून घ्यावे.
4- नेप्तलीन– सापांना घरापासून दूर ठेवण्याचा हा एक सोपा मार्ग असून घराभोवती जर चिखल किंवा दलदल असेल व बराच वेळ त्या ठिकाणी पाणी तुंबून राहत असेल तर त्यामध्ये थोडेसे व्हिनेगर देखील घालता येते व यामुळे साप त्या जागी थोडा वेळ राहतो व नंतर निघून जातो.
5- लिंबू आणि लाल मिरचीचा वापर– लिंबूच्या रसामध्ये लाल मिरची किंवा लिंबू पावडर मिसळावी आणि घराभोवती ते शिंपडावी. त्या ठिकाणी साप येत नाहीत. तसेच तुम्ही कुजलेला कांदा जरी घराभोवती फेकला तरी देखील साप घराभोवती किंवा घरामध्ये येण्याची शक्यता कमी असते.
6- ब्लॅक फिनाइलचा वापर– हॉस्पिटलमध्ये साफसफाईसाठी ब्लॅक फिनाईल वापरले जाते. याचा वापर देखील तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो. याकरिता ब्लॅक फिनाइल पाण्यामध्ये मिक्स करावे आणि दर आठवड्याला घराभोवती त्याची फवारणी करावी. यामुळे ब्लॅक फिनाईलच्या वासाने साप नेहमी पळून जातात.