National Park In India:- हिवाळ्याच्या थंड वातावरणामध्ये कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत तुम्हाला कुठे फिरायला जायचं प्लॅनिंग बनवायचा असेल तर भारतामध्ये अनेक ठिकाणे आहेत की ते हिवाळ्यामध्ये फिरण्यासाठी खूप महत्वाचे असून फिरण्याचा अतुट असा आनंद देऊ शकतात.
अगदी तुम्ही भारताच्या कुठल्याही राज्यांमध्ये जाऊन तुमचा फिरण्याचा मनमुराद आनंद उपभोगू शकतात. याशिवाय बऱ्याच जणांना नैसर्गिक पर्यटन स्थळांना भेट देण्याची आवडतं असते. परंतु त्यासोबतच विविध प्राणी आणि पक्षी पाहण्याची देखील तितकीच आवड असते.
परंतु इतर पक्षी व प्राण्यांपेक्षा जर तुम्हाला वाघासारख्या प्राणी पाहण्याचा जवळून अनुभव घ्यायचा असेल व त्यासोबत पर्यटन देखील करायचे असेल तर भारतामध्ये अशी काही ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे दोन्ही गोष्टी पूर्ण करू शकता.
भारतातील या ठिकाणी फिरायला जाल तर होईल वाघाचे दर्शन
1- रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, राजस्थान- रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे राजस्थानच्या वाळवंटी भागामध्ये पसरलेले असून या ठिकाणी तुम्हाला वाघ अगदी जवळून पाहण्याची सुवर्णसंधी मिळते. डिसेंबर महिन्यामध्ये पाण्याच्या काठावर आणि मोकळ्या जागेमध्ये या ठिकाणी तुम्हाला वाघ फिरताना दिसतात.
इतकेच नाही तर या ठिकाणी जर तुम्ही फिरायला गेलात तर झाडांची आणि झुडपांची संख्या अतिशय कमी असल्यामुळे तुम्हाला सफारीचा देखील आनंद येता येतो व अनेक दृश्य आणि वाघ स्पष्टपणे पाहता येतात.
2- बांधवगड राष्ट्रीय उद्यान, मध्यप्रदेश- भारतामधील सर्वात जास्त वाघांची संख्या जर कुठल्या राष्ट्रीय उद्यानामध्ये असेल तर ती बांधवगड राष्ट्रीय उद्यानात आहे. डिसेंबर महिन्यामध्ये हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वाघ त्यांच्या राहणाऱ्या भागातून आणि घनदाट जंगलांमधून बाहेर पडतात व त्यामुळे पर्यटकांना ते अगदी सहजपणे पाहता येतात. इतकेच नाही तर या ठिकाणी असलेले जंगल तसेच भग्नावशेष पाहण्याची मजा काही औरच असते.
3- कान्हा राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश- कान्हा राष्ट्रीय उद्यान हे देखील मध्य प्रदेश राज्यांमध्ये असून या ठिकाणी विस्तीर्ण पसरलेला गवताळ प्रदेश आणि हिरवीगार असलेली जंगले मोठ्या प्रमाणावर असून या राष्ट्रीय उद्यानामध्ये वाघांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर आहे.
डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी वाघांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते. त्यामुळे तुम्ही जर डिसेंबर महिन्यामध्ये कान्हा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली तर तुमची ही सफारी आणि या ठिकाणी फिरायला जाणे एक रोमहर्षक असा अनुभव ठरेल.
4- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र- महाराष्ट्रातील हा एक घनदाट जंगलाचा भाग असून डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी वाघ दिसणे एक कधीही आठवण पडणार नाही असा अनुभव देऊ शकतो.
तसेच या ठिकाणी असलेल्या मोहर्ली आणि कोलसा या झोनमध्ये जीप सफारीचा आनंद घेऊ शकतात व या सफारी दरम्यान तुम्ही वाघ पाहू शकतात.
5- सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल- या ठिकाणी खारफुटीचे जंगले आणि अनोखी बोट सफारी तुम्हाला या ठिकाणाचे पर्यटन अतिशय खास बनवण्यासाठी मदत करते. डिसेंबर महिन्याच्या थंड हवामानामध्ये येथे वाघ दिसण्याची शक्यता थोडी जास्त प्रमाणामध्ये असते. युनेस्कोच्या माध्यमातून या भागाचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केलेला आहे.
6- जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड– हे राष्ट्रीय उद्यान हिमालयाच्या पायथ्याशी असून भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते. भारतातील वाघांसाठी जे काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत त्यामध्ये हे ठिकाण खूप महत्त्वाचे व लोकप्रिय समजले जाते.
या ठिकाणी महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे डिसेंबर महिन्याच्या थंड वातावरणात वाघ या ठिकाणी सूर्यस्नान करताना आपल्याला दिसून येतात. तसेच या राष्ट्रीय उद्यानामध्ये असलेल्या सैल झोनमध्ये तुम्हाला जीप सफारीचा अनुभव घेता येतो.