Goa Budget Hotel: गोव्यामध्ये फिरायला गेलात आणि राहण्यासाठी हॉटेल हवे का? तर ‘या’ आहेत गोव्यातील प्रसिद्ध स्वस्त हॉटेल

Ajay Patil
Published:
goa

Goa Budget Hotel:- आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वाटते की जेव्हा आपण गोव्यामध्ये हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी जातो तेव्हा त्या ठिकाणी जास्त पैसा खर्च होतो. परंतु तसे पाहायला गेले तर असे बिलकुल काही नाही. तुम्ही अगदी कमीत कमी बजेटमध्ये देखील संपूर्ण गोवा अगदी आरामात फिरू शकतात.

गोव्यामध्ये अशी अनेक हॉटेल आहेत की ज्यामध्ये तुम्ही कमी बजेटमध्ये राहू शकतात. कारण आपण जर कुठे बाहेर फिरायला गेलो तर सगळ्यात जास्त खर्च हा राहण्यावर होतो असे म्हटले जाते.

त्यामुळे तुम्हाला देखील गोवा फिरायला जायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी बजेट हॉटेलमध्ये देखील राहू शकता.त्यामुळे या लेखात आपण अशा काही हॉटेल्स बघणार आहोत की ज्या आता तुम्ही अगदी कमीत कमी खर्चामध्ये देखील राहुन कमी खर्चात गोवा फिरण्याचा आनंद घेऊ शकतात.

 ही आहेत गोव्यातील स्वस्त हॉटेल्स

1- रिसॉर्ट डे टीयो कार्मिनो गोव्यामधील कमी बजेट मध्ये जे काही हॉटेल आहेत त्यामध्ये या हॉटेलचा समावेश होतो. ही हॉटेल कैलंगुट बीच पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असून हॉटेलमध्ये 35 एसी आणि काही नॉन एसी रूम अवेलेबल आहेत. या हॉटेलमध्ये बालकनी या बाथरूम सोबत कनेक्ट असून या कमी बजेट असलेल्या हॉटेलमध्ये एक रेस्टॉरंट तसेच स्विमिंग पूल आणि एक पूल बार देखील आहे.

तसेच या हॉटेलमध्ये कपडे धुण्याची, एटीएम आणि डॉक्टरां ऑन कॉल सेवा देखील तुम्हाला मिळते. तुम्ही गोवा फिरायला गेला व तुम्हाला गोव्याला थांबायचे आहे तर रिसॉर्ट डे टीओ कार्मिनो हा एक परफेक्ट पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे. या हॉटेलपासून आगवाडा किल्ला, कांडोली बीच आणि बागा बीच जवळच आहे.

2- सी व्ह्यू रिसॉर्ट ही हॉटेल साऊथ गोव्यामध्ये असून ती पटणीम बीच पासून 100 मीटर अंतरावर आहे. या हॉटेलमध्ये आरामशीर असे रूम अवेलेबल असून वाय-फायची सुविधा देखील आहे. या हॉटेलच्या रूममध्ये पंखे तसेच एक डेस्क आणि केबल टीव्ही इत्यादी सुविधा देखील तुम्हाला मिळतात व त्यासोबतच रूममध्ये एक फ्रिज व एक पर्सनल बाल्कनी देखील देण्यात आलेली आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा हनिमूनसाठी गोव्याला जात असाल तर तुमच्यासाठी ही हॉटेल एक चांगला पर्याय ठरेल.

3- सिल्वर सॅंड्स सनशाइन ही एक गोव्यातील सर्वात स्वस्त हॉटेल्स म्हणून प्रसिद्ध आहे. या हॉटेलमध्ये रूम सोबत फ्री वाय-फाय तसेच ड्राय क्लीनिंग सेवा, मोफत पार्किंग, उत्तम रूम सर्विस तसेच नाष्टा इत्यादी सेवा उपलब्ध आहेत. या हॉटेलमधील जास्तीत जास्त रूममध्ये मिनी फ्रिज अवेलेबल असून त्याशिवाय हॉटेलमध्ये रेस्टॉरंट तसेच बार व स्विमिंग पूल देखील आहे. साधारणपणे या हॉटेलमध्ये एका रूमची किंमत तेराशे रुपये पासून सुरु होते.

4- जिमी कॉटेज जिमी कॉटेज गोवा शहरात राहण्यासाठी एक सर्वात स्वस्त असा पर्याय आहे. तुम्हाला जर कमी बजेटमध्ये तुमच्या मित्रांसोबत फिरायला जायचे असेल तर जीमी कॉटेज हॉटेल राहण्यासाठी खूप फायद्याचे आहे.

ही हॉटेल कोलावा बीच पासून दीडशे मीटर अंतरावर असून मडगाव येथे आहे. हे कॉटेज एक रेस्टॉरंट तसेच फ्री खाजगी पार्किंग, बार आणि बगीचे यासोबत राहण्यासाठी उत्तम असे रूम पुरवते. तुम्हाला जर गोव्यामध्ये फिरण्याच्या कालावधीत स्वस्त हॉटेलमध्ये थांबायचे असेल तर जिमी कॉटेज हा एक बेस्ट ऑप्शन आहे.

5- हॉटेल सूर्या पॅलेस गोव्यात थांबण्यासाठी हॉटेल सूर्या पॅलेस हा एक चांगला पर्याय आहे.ही हॉटेल सुरवली रेल्वे स्टेशन पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. या हॉटेलच्या रूममध्ये इतर हॉटेलच्या तुलनेत अनेक खास वैशिष्ट्य देण्यात आले असून उत्तम पद्धतीने रूम सजवण्यात आलेले आहेत.

हॉटेलच्या प्रत्येक रूमच्या बाल्कनी मधून तुम्ही शांतपणे दिसणाऱ्या बाग बगीचे पाहू शकतात. यामध्ये तुम्हाला व्हेजिटेरियन आणि नॉनव्हेजिटेरियन अशा दोन्ही पर्यायांमध्ये उत्कृष्ट व स्वादिष्ट खाद्यपदार्थ देखील मिळतात. साधारणपणे  1000 रुपयापासून रूमची या ठिकाणी सुरुवात होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe