Upcoming Cars : मारुती लवकरच लॉन्च करणार ३ स्वस्तात मस्त कार्स ! किंमत सुरु होईल फक्त…

भारतातील प्रसिद्ध असलेली कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी येणाऱ्या कालावधीत तब्बल तीन नवीन कॉम्पॅक्ट सेगमेंट कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

Ajay Patil
Updated:
maruti upcoming car

Upcoming Maruti Cars : भारतीय कार बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये कार उत्पादक कंपन्या कार लॉन्च करताना आपल्याला दिसून येतात व यामध्ये कॉम्पॅक्ट सेगमेंट मधील ज्या काही कार आहेत त्यांना भारतीय ग्राहकांच्या माध्यमातून सातत्याने मागणी दिसून येते. भारतीय कार बाजारपेठेतील जर कॉम्पॅक्ट सेगमेंट पाहिलं तर यामध्ये टाटा नेक्सन,

टाटा पंच तसेच मारुती सुझुकी ब्रेझ्झा यासारख्या कारचे मार्केटमध्ये अधिपत्य आहे. तुम्हाला जर येणाऱ्या कालावधीत नवीन कॉम्पॅक्ट सेगमेंट कार खरेदी करायचे असेल तर मात्र तुम्हाला काही दिवस थांबणे खूप फायद्याचे ठरू शकते.

भारतातील प्रसिद्ध असलेली कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी येणाऱ्या कालावधीत तब्बल तीन नवीन कॉम्पॅक्ट सेगमेंट कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. याच कारच्या बद्दलची माहिती थोडक्यात आपण या लेखात बघू.

 मारुती सुझुकी लॉन्च करणार या कॉम्पॅक्ट सेगमेंट कार

1- नवीन मारुती सुझुकी डिझायर मारुती सुझुकीची डिजायर ही बऱ्याच वर्षापासून भारतीय ग्राहकांमध्ये प्रसिद्ध असलेली आणि सर्वात जास्त विक्री होणारी सेडान कार आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणून आता ही कंपनी त्यांची लोकप्रिय हॅचबॅक मारुती स्विफ्टच्या अपडेटेड आवृत्तीला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर मारुती सुझुकी डिजायर देखील अपडेट करणार आहे.

अनेक मीडिया रिपोर्टमध्ये याबद्दल दावा करण्यात आला आहे की,येणाऱ्या कालावधीत अपडेटेड मारुती सुझुकी डिजायर 2024 या वर्षाच्या अखेरीस भारतीय बाजारात लॉन्च केली जाऊ शकते.

नवीन डिझायरमध्ये 1.2- लिटर तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात येईल व ग्राहकांना मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्याय देखील यामध्ये मिळणार आहे.

2- नवीन मारुती सुझुकी बलेनो मारुती सुझुकी बलेनो ही भारतीय बाजारपेठेत लाँच झाल्यापासून सर्वाधिक विकली जाणारी हॅचबॅक कार आहे. आता कंपनीच्या माध्यमातून येत्या काही वर्षात मारुती सुझुकी बलेनोचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे.

मारुती सुझुकीच्या माध्यमातून या अपडेटेड आगामी येऊ घातलेल्या मारुती सुझुकी बलेनोच्या बाह्य आणि आतील भागांमध्ये मोठे बदल केले जातील अशी शक्यता आहे. मात्र मारुती सुझुकीने अद्याप पर्यंत या बाबतीत कुठल्याही प्रकारचे अधिकृत घोषणा केलेली नाही.

3- मारुती सुझुकी फ्रॉँक्स मारुती सुझुकीची ही देखील कार सर्वात जास्त विकली जाणाऱ्या एसयूव्ही पैकी एक आहे. ही कार येणाऱ्या काळात नवीन अपडेट मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते.

जर आपण काही वेबसाईट नुसार बघितले तर पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये मारुती सुझुकी भारतीय बाजारात अपडेटेड मारुती सुझुकी फ्रॉँक्स लॉन्च करू शकते. या अपडेटेड मारुती सुझुकी फ्रॉँक्स मध्ये 1.2- लीटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हेच इंजिन नवीन स्विफ्टमध्ये देखील आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe