Breaking : अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा अन ‘त्या’ जिल्ह्यात गारपीट होणार ; हवामान विभागाचा इशारा

Ajay Patil
Published:
Maharashtra Weather Update

IMD Weather Update : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे तर काही जिल्ह्यात गारपीट देखील झाली आहे.

यामुळे रब्बी हंगामातील काढणी योग्य पिकांची ठाणे झाली असून शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाल आहे. राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक विशेषता नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या भागात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. धुळ्यात तर गारपीट झाली होती.

यामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या काढणी योग्य पिकांचे मोठे नुकसान झाले. सोबतच डाळिंब द्राक्ष केळी पपई या फळ पिकांचे आणि भाजीपाला पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. या अवकाळी आणि गारपीटीतून थोड्याफार प्रमाणात पीक बचावल आहे आता ते पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने आजपासून चार दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेष बाब म्हणजे परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील नुकत्याच दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. जर आपणास पंजाब रावांनी वर्तवलेला अंदाज सविस्तर जाणून घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पंजाबरांचा नवीन हवामान अंदाज :- पंजाबराव डख : 14 मार्चपासून अहमदनगर, नासिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, नांदेड, लातूर अन ‘या’ जिल्ह्यात ‘इतके’ दिवस पाऊस पडणार!

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 15 आणि 16 मार्च रोजी राज्यातील मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. 15 मार्चला मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नासिक या जिल्ह्यात गारपीटीची शक्यता देखील विभागाने वर्तवली आहे.

यासोबतच विदर्भ आणि मराठवाड्यात 16 आणि 17 मार्च रोजी अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. यासोबतच पुढील दोन दिवस कोकणात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील पालघर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पुढील दोन दिवस वादळी वारा आणि पावसाची शक्यता राहणार आहे.

या जिल्ह्यात आहे गारपीटीची शक्यता

15 मार्च 2023 रोजी धुळे जळगाव आणि नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

16 मार्च 2023 रोजी जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात गारपिटीची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

17 मार्च 2023 रोजी चंद्रपूर गडचिरोली वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात गारपीटीची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

एकंदरीत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात पावसाची शक्यता आणि काही जिल्ह्यात गारपीटीची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी काढणी योग्य पिकांची काळजी घेणे आणि काढणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी साठवणे आवश्यक असून आपल्या पशुधनाची या कालावधीमध्ये काळजी घेणे गरजेचे राहणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe