Importance Of Cibil Score : आपल्याला प्रत्येकाला केव्हा ना केव्हा कर्जाची गरज ही भासत असते. वैयक्तिक गरजेपोटी किंवा घर बांधण्यासाठी किंवा वाहन खरेदी करण्यासाठी आपण कर्ज हे काढत असतो. कर्ज काढताना मात्र बँकांकडून सिबिल स्कोर तपासला जातो. म्हणजेच बँका आपल्या क्रेडिट हिस्टरी ची माहिती सर्वप्रथम घेत असतात. सिबिल स्कोर आपली क्रेडिट हिस्ट्री दाखवते. जर सिबिल स्कोर कमी असेल तर आपली क्रेडिट हिस्टरी खराब असते.
तसेच जर सिबिल स्कोर हा चांगला असेल म्हणजेच साधारणता 750 च्या पुढे, तर क्रेडिट हिस्टरी उत्तम असते आणि बँका आपल्याला ताबडतोब कर्ज देण्यास तयार होतात. सिबिल स्कोर फक्त कर्ज घेण्यासाठीच उपयोगाचा असतो असे नाही तर क्रेडिट कार्ड काढण्यासाठी देखील हा स्कोर अतिमहत्त्वाचा असा घटक ठरतो.तज्ञांच्या मते आपला सिबिल स्कोर हा किती कर्ज मंजूर होईल, कर्जावर किती व्याजदर आकारले जाईल, हे देखील ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. हा 300 ते 900 या दरम्यान गणला जातो.
हा Cibil Score किंवा क्रेडिट स्कोर तुम्ही यापूर्वी किती कर्ज घेतले आहे आणि कर्ज घेताना तुम्ही परतफेडीला उशीर केला आहे का? तुमचे सर्व वैयक्तिक तपशील, नोकरीचे तपशील, बँक खात्याचे तपशील, मागील कर्जाचे तपशील इत्यादी नोंदवून तयार करण्यात आलेला असतो. यामुळे या स्कोरला कर्ज घेताना आणि क्रेडिट कार्ड घेताना अधिक महत्त्व प्राप्त होतं. दरम्यान आज आपण क्रेडिट स्कोरचे महत्व आणि हा स्कोर कसा तपासायचा याविषयी जाणून घेणार आहोत.
कसा तपासणार सिबिल स्कोर
यासाठी सर्वप्रथम https://www.cibil.com या वेबसाईटवर भेट द्या. यानंतर get free CIBIL score and report या पर्यायावर क्लिक करा. यानंतर त्या ठिकाणी एक फॉर्म उघडेल त्यामध्ये विचारलेली संपूर्ण वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरा. यानंतर, तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर पाहता येऊ शकतो.
सिबिल स्कोर का आहे महत्त्वाचा
कोणत्याही बँकेत कोणतही कर्ज प्राप्त करण्यासाठी बँकांच्या माध्यमातून सर्वप्रथम सिबिल स्कोर चेक केला जातो. यानंतर संबंधित व्यक्तीला कर्ज मंजूर होतं. केवळ कर्ज मंजूर होण्यासाठी त्याचा फायदा होतो असे नाही तर यामुळे कमी व्याजदरात देखील कर्ज मिळतं.
जर चांगला सिबिल स्कोर म्हणजेच 750 च्या पुढे असेल तर बँका ह्या ज्या काही अनावश्यक कागदपत्रे असतात त्यां देखील मागत नाहीत. म्हणजेच कमी कागदपत्रात संबंधित व्यक्तीला कर्ज उपलब्ध होत. यामुळे हा स्कोर चांगला ठेवण्यासाठी वेळेवर कर्जाची परतफेड करणे, ईएमआय वेळेवर भरणे, क्रेडिट लिमिट 30% पेक्षा कमीच वापरणे यांसारख्या उपाययोजना करणे अति महत्त्वाचे ठरते.