BHIM UPI वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ; करू शकणार ‘असे’ काही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- डिजिटल व्यवहारासाठी भीम यूपीआय वापरणार्‍या ग्राहकांच्या पेमेंट प्लॅटफॉर्ममध्ये एक नवीन सुविधा जोडली गेली आहे. याच्या मदतीने ग्राहकांना त्यांच्या पेंडिंग व्यवहाराची स्थिती जाणून घेता येईल आणि तक्रारही नोंदवता येईल.

एनपीसीआयने भीम यूपीआय वर ‘यूपीआय हेल्प’ सुरू केली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) म्हटले आहे की कस्टमर फ्रेंडली आणि ट्रांसपरेंट रेड्रेरसल सिस्टम तयार करण्याच्या दृष्टीने हे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुरूप आहे.

एनपीसीआयने दिलेल्या निवेदनानुसार एनपीसीआयने भीम यूपीआय वर ‘यूपीआय हेल्प’ सुरू केली आहे. सुरुवातीला एनपीसीआयने भीम अ‍ॅपवर हे फीचर्स भारतीय स्टेट बँक, एक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी सादर केले आहे.

प्रसिद्धीनुसार ग्राहक आपल्या पेंडिंग ट्रांजेक्शनची स्थिती शोधू शकतील आणि व्यवहाराशी संबंधित तक्रारींसाठी यूपीआय हेल्प वापरू शकतील. अ‍ॅपमध्ये मर्चेंट व्यवहारांसाठी तक्रार करण्याची सुविधा देखील असेल.

पेटीएम पेमेंट्स बँकेत लवकरच सुविधा मिळेल :- पेटीएम पेमेंट्स बँक आणि टीजेएसबी सहकारी बँकेचे ग्राहकही लवकरच यूपीआय-हेल्पचा लाभ घेण्यास सक्षम होतील, असे एनपीसीआयने म्हटले आहे. यूपीआय वापरणार्‍या अन्य बँकांचे ग्राहकही येत्या काही महिन्यांत या सुविधेचा लाभ घेऊ शकतील, असे एनपीसीआयने म्हटले आहे.

एनपीसीआय ही भारतातील रिटेल पेमेंट्स आणि सेटलमेंट सिस्टमसाठी अम्ब्रेला आर्गनाइजेशन आहे. एनपीसीआयच्या पेमेंट प्रॉडक्ट्स पोर्टफोलिओमध्ये रुपी कार्ड,

इमीडिएट पेमेंट सर्व्हिस (आयएमपीएस) आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय), भारत इंटरफेस फॉर मनी (बीएचआयएम), BHIM आधार, नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (एनईटीसी फास्टॅग) आणि भारत बिल पे यांचा समावेश आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe