ज्या कुणाला या महिन्यात किंवा पुढच्या महिन्याच्या कालावधीमध्ये बाईक विकत घ्यायचा विचार असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण या ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक नामांकित अशा कंपन्यांकडून आकर्षक वैशिष्ट्ये असलेल्या धमाकेदार बाईक लॉन्च करण्यात येणार आहेत.
यामध्ये स्पोर्ट बाईक पासून तर इलेक्ट्रिक बाईकचा समावेश असणार आहे. त्यामुळे आता बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी हे नवीन चार बाईकचा उत्तम पर्याय बाजारपेठेत निर्माण होणार आहे.

नेमक्या कोणत्या कंपनीच्या माध्यमातून कोणत्या बाईक लॉन्च केले जाणार आहेत व त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत? याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आपण थोडक्यात या लेखात घेऊ.
या महिन्यात लॉन्च होतील या धमाकेदार बाईक्स
1- बीएसए गोल्ड स्टार 650- जर आपण बीएसए हा ब्रँड पाहिला तर हा भारतातील महिंद्रा ग्रुपच्या अंतर्गत येतो. आता लॉन्च होत असलेली गोल्ड स्टार 650 ही एक रेट्रो क्लासिक बाईक असून या बाईकमध्ये दोन स्पार्क प्लग व 652 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलेले आहे.
जे 5000 rpm वर 45 बीएचपी आणि ४००० आरपीएम वर 55 एनएम आउटपुट आहे. तसेच या बाईकमध्ये पाच स्पीड गिअर बॉक्सला स्लीपर क्लच मिळतो. या बाईक मध्ये डिस्क ब्रेक आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम मिळेल. ही बाईक 15 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात येणार आहे.
2- ओला इलेक्ट्रिक बाइक– ओला इलेक्ट्रिकच्या माध्यमातून पहिली ऑल इलेक्ट्रिक मोटरसायकलचे अनावरण करण्यात येणार असून हे अनावरण 15 ऑगस्ट रोजी होणार आहे. परंतु ही बाईक साधारणपणे पुढच्या वर्षी बाजारात येईल अशी अपेक्षा आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर एक टीजर शेअर केला आहे.
यामध्ये कंपनी प्रवाशांच्या सेगमेंटसाठी नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल प्रदर्शित करू शकते. ओला इलेक्ट्रिकचा हा तिसरा स्वातंत्र्य दिन सोहळा असेल. ही मोटरसायकल डिझाईनमध्ये भविष्यवादी आणि वायूच्या गतीने धावणारी दिसते.
कंपनीच्या माध्यमातून या बाईकची मोटर आणि बॅटरीची वैशिष्ट्ये आणि श्रेणी उघड करण्यात आलेली नाही. परंतु त्याच्या इलेक्ट्रिक स्कूटर प्रमाणे या बाईकला ओव्हर द एअर अपडेट सोबत स्मार्ट कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये मिळतील.
3- 2024 टीव्हीएस ज्युपिटर– स्कूटरमध्ये हा देशातील दुसरा सर्वाधिक विक्री होणारा ब्रँड असून ही स्कूटर दोन एडिशनमध्ये सध्या उपलब्ध आहे. त्यातील पहिली म्हणजे 110cc ट्रिम आणि दुसरी अधीक शक्तिशाली 125cc क्षमतेचे आहे. टीव्हीएस ज्युपिटर ११० सीसीला अत्यंत आवश्यक अपडेट देण्याची योजना कंपनीच्या माध्यमातून आखण्यात येत आहे.
कंपनीच्या माध्यमातून सोशल मीडियावर एक टीझर शेअर करण्यात आलेला असून यामध्ये बघितले तर या स्कूटरला नवीन कनेक्टेड एलइडी डीआरएल बारसह नवीन फ्रंट फेशिया मिळण्याची अपेक्षा आहे.
तसेच या बाईकच्या सीट खालील जो काही स्टोरेज आहे तो वाढू शकते. तसेच स्कूटरमध्ये 7.7 बीएचपी 109.7cc इंजिन दिले जाईल. जे 8.8 एनएम टॉर्क निर्माण करते आणि सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह मिळते.
4- ट्रायम्प डेटोना 660- ट्रायम्प मोटरसायकलच्या कंपनीने ट्रायम्प डेटोना 660 भारतामध्ये लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. ही ब्रिटिश टू व्हीलर निर्माती कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून या स्पोर्ट्स बाईक विषयी माहिती देण्यात आलेली आहे.
ही बाईक ट्यूबलर स्टील पेरिमीटर फ्रेमवर आधारित मोटर सायकलला 17 इंच अलॉय व्हील, 110 मिमी प्रवासासह 41 मीमी अपसाईड डाऊन शोवा फ्रंट फॉर्क आणि 130 mm प्रवाशासह शोवा मोनो शॉक देण्यात आलेला आहे. ट्वीन ३१० मीमी फ्रंट डिस्क ब्रेक आणि एबीएससह सिंगल 220 मीमी रियर डिस्क ब्रेक आहे.
ही बाईक 11250 आरपीएम वर 94 बीएचपी आणि 8250 आरपीएम वर 69 एनएमसह 660 सीसी लिक्विड कुल्ड तीन सिलेंडर द्वारे समर्थित असून ती स्लिप आणि क्लचसह सहा स्पीड गिअर बॉक्स बरोबर जोडलेले आहे.