राज्यातील ‘या’ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि सर्व भत्त्यांमध्ये भरघोस वाढ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Published on -

सध्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला व त्यामध्ये विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. त्यामध्ये महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच  शेतकरी व मुलांसाठी देखील अनेक योजनांची घोषणा या माध्यमातून करण्यात आली.

तसेच या निवडणुकीच्या तोंडावर कोणताही घटक नाराज राहू नये याकडे सरकारचे लक्ष असल्याचे दिसून येत असून त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून वीज कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्यासंबंधीची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 तिन्ही वीज कंपन्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सर्व भत्यामध्ये वाढ

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला असून त्यासंबंधीची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या निर्णयाचा फायदा महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणार आहे. ऊर्जा विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या या तिन्ही वीज कंपन्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मूळ वेतनामध्ये साधारणपणे 19 टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्क्यांची वाढ देण्यात येत असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली.

काल सह्याद्री अतिथीगृहावर ऊर्जा विभागाच्या आधीपत्याखाली असणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित आणि महापारेषण या वीज कंपन्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबतच्या बैठकीत फडणवीस यांनी ही माहिती दिली. या बैठकीला ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला व तिन्ही वीज कंपन्यांचे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

 काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

याबाबत माहिती देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांचे जे अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांच्या मूळवेतनामध्ये 19 टक्के आणि मिळणाऱ्या सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढ देण्याचे मान्य करण्यात आले.

याशिवाय सहाय्यकाना परीविक्षाधीन कालावधी करिता पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा पाचशे रुपयांचा भत्ता 1 हजार रुपये करण्यात आला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe