10वी पास तरुणांसाठी मोठी बातमी ! भारतीय सैन्यात ‘या’ पदासाठी सुरू झाली मोठी भरती, ‘या’ पत्त्यावर पाठवायचा आहे अर्ज, पहा संपूर्ण माहिती…

Indian Army Recruitment

Indian Army Recruitment : दहावी पास तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना भारतीय सैन्यात सामील होऊन देशाची सेवा करायचे असेल अशा तरुणांसाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे. भारतीय सैन्यात काही रिक्त पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मधील रिक्त पद भरली जाणार आहेत.

विशेष म्हणजे यासाठीची अधिसूचना नुकतीच निर्गमित झाली आहे. सदर अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार या भरतीमधून तब्बल 236 रिक्त पदे भरली जाणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या भरती बाबत सर्व आवश्यक माहिती थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंताजनक ! यंदा मान्सून काळात ‘असं’ होणार, शेतकऱ्यांच मोठं नुकसान होईल; पंजाबराव डख यांचा नवीन मान्सून अंदाज

कोणती आणि किती पदे भरली जाणार?

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार भारतीय सैन्याच्या ASC सेंटरमध्ये 236 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये, कुक – ०२ पदे, सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर – १९ पदे, निम्न श्रेणी लिपिक – ०५ पदे, ट्रेड्समन मेट (लेबर) – १०९ पदे, टिन स्मिथ – ०८ पदे, बार्बर – ०३ पदे, एमटीएस (चौकीदार) – १७ पदे, सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – ३७ पदे, क्लिनर (सफाईकर्मी) – ०५ पदे, व्हेईकल मेकॅनिक – १२ पदे, पेंटर – ०३ पदे, कारपेंटर – ११ पदे, फायरमन – ०१ पद, फायर इंजिन ड्राइव्हर ०४ पदे अशी एकूण 236 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

दहावी पास उमेदवार या पदांसाठी पात्र राहणार आहे. तसेच काही पदांसाठी संबंधित विषयातील ITI अन अन्य कोर्सेस देखील आवश्यक राहणार आहेत. यामुळे इच्छुकांनी एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! आता महाराष्ट्रात NA टॅक्स लागणार नाही; महसूल मंत्री विखे पाटलांची मोठी घोषणा

अर्ज कसा करावा लागेल?

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. यामध्ये कुक, सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर, निम्न श्रेणी लिपिक, ट्रेड्समन मेट (लेबर), टिन स्मिथ, बार्बर, एमटीएस (चौकीदार) या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आपला अर्ज पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (दक्षिण)-2 ATC, आग्राम पोस्ट, बंगलोर -07 या पत्त्यावर पाठवायचा आहे.

तसेच, एमटीएस (चौकीदार), सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर, क्लिनर (सफाईकर्मी), व्हेईकल मेकॅनिक, पेंटर, कारपेंटर, फायरमन, फायर इंजिन ड्राइव्हर या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना, पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (उत्तर) – 1 ATC, Agram पोस्ट, बंगलोर-07 या पत्त्यावर आपला अर्ज सादर करायचा आहे. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार; भारतीय हवामान विभागाचा इशारा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe