तरुणांसाठी आनंदाची बातमी ! इंडियन नेव्ही मध्ये तब्बल 372 रिक्त पदांसाठी निघाले भरती, अर्ज कुठं करणार? पहा…

Ajay Patil
Published:

Indian Navy Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः ज्यांनी सायन्स फॅकल्टी मध्ये ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवी ग्रहण केलेली असेल अशा तरुणांसाठी ही बातमी खास राहणार आहे.

कारण की भारतीय नौदलात म्हणजेच इंडियन नेव्ही मध्ये रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीमध्ये इंडियन नेव्ही ची 372 रिक्त पद भरले जाणार आहेत.

यासाठीची अधिसूचना देखील इंडियन नेव्ही च्या माध्यमातून निर्गमित झाली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय ! ‘या’ कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना; पहा…

कोणत्या रिक्त पदांसाठी होणार भरती?

इंडियन नेव्ही ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, चार्जमन-II या पदाच्या रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार भरती?

Indian Navy मध्ये या पदाच्या एकूण 372 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार हा बॅचलर ऑफ सायन्स मध्ये पदवीधर असावा. मात्र सदर उमेदवाराने मॅथेमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयात बीएससी केलेली असणे अनिवार्य आहे.

हे पण वाचा :- रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावर पुन्हा सुरू झाली वंदे भारत एक्सप्रेस, वाचा सविस्तर

आवश्यक वयोमर्यादा

पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार हा किमान 18 वर्षे वयाचा आणि कमाल 25 वर्षे वयाचा असणे आवश्यक आहे. 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवारांनाच यासाठी अर्ज करता येणार आहे याची नोंद घ्यायची आहे.

अर्ज कसा करावा लागणार?

या पदासाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांना ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज विहित कालावधीमध्ये सादर करायचा आहे. joinindiannavy.gov.in या भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक

भारतीय नौदलात निघालेल्या या पदभरतीसाठी 29 मे 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने वर दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन सादर करता येणार आहे.

हे पण वाचा :- पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात ‘या’ पदासाठी निघाली भरती, आजच इथं करा अर्ज

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe