भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती, असा करा अर्ज

Published on -

Indian Navy Recruitment : देशभरातील लाखो उमेदवारांना भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असते. लाखो विद्यार्थी यासाठी तयारी करत असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आता समोर येत आहे. भारतीय नौदलात आता काही रिक्त पदाची भरती काढण्यात आली आहे.

यासाठीची अधिसूचना देखील नुकतीच निर्गमित झाली असून इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान आज आपण या भारतीय नौदलात सुरु झालेल्या भरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- कोरोनात नोकरीं गेली सुरु केली शेती ! 30 गुंठ्यात ‘या’ पिकाची लागवड केली अन झाली 10 लाखाची कमाई, वाचा ही यशोगाथा

कोणत्या आणि किती पदांसाठी सुरू झाली भरती?

भारतीय नौदलाच्या माध्यमातून शॉर्ट सर्विस कमिशन या पदाचा रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. या पदभरती प्रक्रियेच्या माध्यमातून तब्बल 227 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता? अन वयोमर्यादा 

शैक्षणिक पात्रते संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तसेच वयोमर्यादेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी लागणार आहे. अधिसूचना पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/1_YImd9BiYBOCS2ke4ItvoxkI06zUK8Qf/view या लिंक वर जाऊन आपण पीडीएफ स्वरूपात जाहिरात पाहू शकणार आहात.

अर्ज कसा करावा लागेल

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. https://www.joinindiannavy.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवार आपला अर्ज सादर करू शकणार आहेत.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यात पडणार वादळी पाऊस; हवामान विभागाची माहिती

अर्ज प्रक्रिया संदर्भात 

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 29 एप्रिल 2023 पासून आपला अर्ज ऑनलाइन सादर करता येणार आहे. अर्ज सादर करण्याचे दिनांक 14 मे 2023 राहणार आहे. यामुळे अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विहित कालावधीमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अर्जासाठी किती शुल्क लागेल?

यासाठी कोणत्याही उमेदवाराकडून शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. 

जाहिरात कुठे पाहणार

भारतीय नौदलात निघालेल्या या पदभरतीची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी भारतीय नौदल भरती प्रक्रिया 2023 या लिंक वर क्लिक करा.

 हे पण वाचा :- ठाणेकरांना लवकरच मिळणार गिफ्ट ! ‘या’ तीन मार्गांवर सुरु होणार एसी लोकल; रूटची माहिती इथं वाचा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!