Indian Origin Billionaires In America : ‘फोर्ब्स’ ने अलीकडेच जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली होती. जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या या यादीनुसार मुकेश अंबानी हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते फक्त भारतातीलच नाही तर आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत आणि गौतम अदानी हे देशातील सर्वात श्रीमंत दुसरी व्यक्ती आहेत.
पण आज आपण भारतीय वंशाच्या सर्वाधिक श्रीमंत अमेरिकन व्यक्तींची माहिती पाहणार आहोत. अमेरिकेतील टॉप 10 सर्वात श्रीमंत भारतीय वंशाचे व्यक्ती कोण आहेत, या यादीत पहिल्या क्रमांकावर कोणाचा नंबर लागतो? याचीच माहिती आज आपण येथे पाहणार आहोत.

अमेरिकेतील टॉप 10 सर्वात श्रीमंत भारतीय वंशाचे व्यक्ती
सुंदर पीचाई : Alphabet Inc. (Google) चे CEO सुंदर पीचाई हे अमेरिकेतील सर्वात श्रीमंत भारतीय वंशांच्या व्यक्तीच्या यादीत दहाव्या नंबर वर आहेत. त्यांच्याकडे 1.1 बिलियन डॉलरची संपत्ती आहे.
निकेश अरोरा : टॉप 10 सर्वात श्रीमंत भारतीय वंशाचे अमेरिकन व्यक्तींच्या यादीत निकेश अरोरा यांचा नववा नंबर लागतो. ते पालो अल्टो नेटवर्क चे सीईओ आहेत. त्यांच्याकडे एकूण 1.4 बिलियन डॉलरची संपत्ती आहे.
डेव्हिड पॉल : ग्लोबस मेडिकल (medtech) चे फाउंडर डेविड पॉल या यादीत आठव्या नंबर वर येतात आणि त्यांच्याकडे एकूण 1.5 बिलियन डॉलरची संपत्ती आहे.
राज सरदाना : इनोवा सोल्युशन्स या कंपनीचे सीईओ राज सरदाना हे सुद्धा या यादीत आहेत या यादीत त्यांचा सातवा नंबर लागतो. ‘फोर्ब्स’ च्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडे एकूण दोन बिलियन डॉलरची संपत्ती आहे.
कवितार्क राम श्रीराम : अर्ली गुगल इन्वेस्टर आणि शर्पालो वेंचर्सचे कवितार्क राम श्रीराम या यादीत सहाव्या नंबर वर येतात. त्यांच्याकडे एकूण तीन बिलियन डॉलरची संपत्ती आहे.
राजीव जैन : GQG पार्टनरचे (Investment Management) फाउंडर राजीव जैन या यादीत पाचव्या नंबर वर येतात आणि त्यांच्याकडे एकूण 4.8 बिलियन डॉलर ची संपत्ती आहे.
रोमेश टी. वाधवानी : SymphonyAI; Philanthropy चे रमेश टी वाधवानी सुद्धा या यादीत येतात, या यादीत वाधवानी यांचा चौथा नंबर आहे. त्यांच्याकडे एकूण पाच बिलियन डॉलरची संपत्ती आहे.
राकेश गंगवाल : इंडिगो एअरलाइन्सचे को-फाउंडर राकेश गंगवाल या यादीत तिसऱ्या नंबर वर येतात. त्यांच्याकडे एकूण 6.6 बिलियन डॉलरची संपत्ती आहे.
विनोद खोसला : सन मायक्रो सिस्टम ; खोसला वेंचरचे को – फाउंडर विनोद खोसला आहे या यादीत दुसऱ्या नंबर वर येतात. त्यांच्याकडे एकूण 9.2 बिलियन डॉलरची संपत्ती आहे.
जय चौधरी : Zscaler (Cybersecurity) चे फाउंडर जय चौधरी हे भारतीय वंशाचे अमेरिकेतील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. ‘फोर्ब्स’ च्या 2025 ज्या जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीनुसार जय चौधरी यांच्याकडे एकूण 17.9 बिलियन डॉलरची संपत्ती असून ते अमेरिकेतील भारतीय वंशाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.