India’s Private Railway Station : भारतात रेल्वेचे नेटवर्क हे सर्वाधिक मोठे नेटवर्क आहे. देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. देशातील सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रेल्वे उपलब्ध आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाकडून सातत्याने नवनवीन निर्णय घेतले जात आहेत.
वंदे भारत ट्रेन सारख्या हायस्पीड ट्रेन सुरू केल्या जात आहेत. एवढेच काय तर भविष्यात हायड्रोजन ट्रेन आणि बुलेट ट्रेन देखील धावताना दिसणार आहे. सध्या भारतात 8800 रेल्वे स्टेशन आहेत. हे सर्व रेल्वे स्टेशन सरकारच्या मालकीचे आहेत म्हणजेच सरकारी रेल्वे स्टेशन आहेत.

पण यामध्ये भारतातील पहिल्या आणि एकमेव खाजगी रेल्वे स्थानकाचा सुद्धा समावेश आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण भारतात एक खाजगी रेल्वे स्थानक सुद्धा आहे. दरम्यान आज आपण देशातील या पहिल्या खाजगी रेल्वे स्थानकाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कुठे आहे देशातील पहिले प्रायव्हेट रेल्वे स्टेशन?
राणी कमलपती रेल्वे स्टेशन हे भारतातील एकमेव खाजगी रेल्वे स्थानक आहे. त्याचा स्टेशन कोड आरकेएमपी आहे. हे स्टेशन भोपाळ मध्ये आहे. भोपाळ शहरातील हे दुसरे रेल्वे स्थानक आहे.
15 नोव्हेंबर 2021 रोजी पंतप्रधान मोदी यांनी या देशातील पहिल्या खाजगी रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले होते. राणी कमलापती रेल्वे स्टेशन हे भारतातील पहिले जागतिक दर्जाचे खासगी रेल्वे स्थानक आहे.
हे आयएसओ प्रमाणित पहिले खासगी रेल्वे स्थानक आहे. 14 नोव्हेंबर 2021 रोजी हबीबगंज रेल्वे स्टेशनचे नाव ‘राणी कमलापती’ असे करण्यात आले.
ये प्रायव्हेट रेल्वे स्थानक ज्या राणी कमलापती यांच्या नावाने विकसित करण्यात आले आहे त्या भोपाळ संस्थानाची शेवटची हिंदू राणी होत्या. गोंड समाजाचा अभिमान, गौरव राणी कमलापती यांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले आहे. त्या आदिवासी राणी होत्या.
हे देशातील पहिले आणि एकमेव प्रायव्हेट रेल्वे स्थानक असून यामध्ये असणाऱ्या सोयी सुविधा या फारच हायटेक आहेत. असे म्हणतात की या रेल्वे स्थानकावर अगदीच एअरपोर्ट सारख्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.