India’s Richest Persons : भारत हा तेजीने विकसित होणारा देश. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपल्या देशाने जपानला मागे टाकत हा नवीन बहुमान पटकावला आहे. विशेष बाब अशी की, आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
तथापि, आपल्या देशात संपत्तीचे वितरण हे फारच असमान आहे. म्हणजेच देशातील एकूण संपत्ती पैकी बहुतांशी संपत्ती ही काही मोजक्याच लोकांकडे आहे. यामुळे पर कॅपिटा इन्कम मध्ये आपला देश हा फार मागे आहे. दरम्यान, फोर्ब्सकडून नुकतीच जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

यात आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आपल्या भारतात असल्याचे समोर आले आहे. पण आज आपण जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची माहिती जाणून घेण्याऐवजी या यादीनुसार भारतातील टॉप 10 श्रीमंत लोक कोण आहेत याची? माहिती पाहणार आहोत.
ही आहेत भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोक
भारतातील टॉप 10 श्रीमंत लोकांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आर्सेलर मित्तल ग्रुपचे लक्ष्मी मित्तल यांचा नंबर लागतो. तसेच श्रीमंतांच्या या यादीत नवव्या नंबरवर डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांचा नंबर लागतो. आठव्या क्रमांकावर आदित्य बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला यांना स्थान मिळाले आहे.
सातव्या क्रमांकावर डीएलएफ ग्रुपचे कुशल पाल सिंग यांचा नंबर लागतो. सहाव्या क्रमांकावर सेरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला जे की कोविड काळात विशेष चर्चेत राहिलेत त्यांचा नंबर लागतो. पाचव्या क्रमांकावर सन फार्मा कंपनीचे दिलीप सांगवी यांनी आपले स्थान पक्के केले आहे.
या यादीत जिंदाल ग्रुपच्या सावित्री जिंदाल चौथ्या क्रमांकावर येतात आणि त्या देशातील सर्वाधिक श्रीमंत महिला बनल्या आहेत, त्यांची एकूण संपत्ती 33.5 अब्ज डॉलर असल्याची माहिती फोर्ब्सकडून समोर आली आहे.
या भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी एचसीएल टेकचे संस्थापक शिव नाडर तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत, त्यांची संपत्ती सुमारे 36.9 अब्ज डॉलर असल्याची माहिती समोर आली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर कोणाचा नंबर ?
भारतातील सर्वाधिक श्रीमंत टॉप 10 लोकांच्या यादीत गौतम अदानी यांचा दुसरा नंबर लागतो. अदाणींची एकूण संपत्ती सुमारे 84 अब्ज डॉलर आहे. खरे तर गौतम अदानी यांचा समूह वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. ऊर्जा, बंदर आणि रिअल इस्टेट क्षेत्रात या समूहाने गेल्या काही वर्षांमध्ये फारच चमकदार कामगिरी केली आहे.
खरंतर गौतम अदानी हे मागे एका मोठ्या वादात सापडले होते आणि शेअर बाजारात देखील मोठी चढ-उतार होत आहे यामुळे अदानींना याचा मोठा फटका बसलाय आणि त्यांची संपत्ती थोडी कमी झाली पण असे असले तरी ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनण्याचा बहुमान पटकावला होता एवढेच नाही तर ते आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते.
पहिल्या क्रमांकावर कोणाचा नंबर ?
भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी यांचा पहिला नंबर लागतो. ते फक्त भारतातीलच नाही तर आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सातत्याने देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून पहिल्या स्थानी येत आहेत. फोर्ब्सकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार मुकेश अंबानी यांच्याकडे 116 अब्ज डॉलर म्हणजेच 9.5 लाख कोटी डॉलर इतकी संपत्ती आहे.