एअरटेलच्या ग्राहकांचा खिसा होणार रिकामा! जिओ नंतर एअरटेलने देखील वाढवले रिचार्ज दर, वाचा नवीन वाढलेले दर

Ajay Patil
Published:
airtel recharge plan

देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्या असलेल्या रिलायन्स जिओच्या माध्यमातून काल म्हणजेच गुरुवारी मोबाईलच्या रिचार्ज दरामध्ये जवळपास 12 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली व आता त्याच्या एकच दिवसानंतर म्हणजेच आज 28 जून रोजी देशातील जिओ नंतर प्रमुख असलेली भारतीय एअरटेलने देखील रिचार्ज दरांमध्ये जवळपास 10 ते 21 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली.

विशेष म्हणजे जीओप्रमाणेच हे वाढलेले दर एअरटेल देखील तीन जुलै 2024 पासून लागू करणार आहे. त्यामुळे आता एअरटेलच्या ग्राहकांना आर्थिक दृष्टिकोनातून हा एक फटकाच म्हणावा लागेल. भारतीय airtel च्या माध्यमातून पोस्टपेड आणि प्रीपेड असे दोन्ही प्लान आता महाग करण्यात आलेले आहेत.

याबाबत एअरटेलने म्हटले की, भारतामधील दूरसंचार कंपन्यांकरिता आर्थिकदृष्ट्या मजबूत व्यवसाय मॉडेल सक्षम करण्यासाठी प्रति वापरकर्ता सरासरी महसूल 300 रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे व त्याकरिता आम्ही एन्ट्री लेवल प्लॅनमध्ये दररोज सत्तर पैशांनी वाढ करत आहोत. विशेष म्हणजे टेलिकॉम कंपन्यांच्या माध्यमातून नोव्हेंबर 2021 नंतर पहिल्यांदाच दरवाढ करण्यात आलेली आहे.

 कसे आहेत नवीन वाढलेल्या दरानुसार एअरटेलचे रिचार्ज प्लान?

एअरटेलने देखील आज रिचार्ज प्लानमध्ये वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता एअरटेल ग्राहकांना देखील आर्थिक फटका बसणार आहे. आपण एअरटेलचे नवीन दर पाहिले तर एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लान हा 179 रुपयांचा होता व आता या नवीन दरवाढीनुसार हा प्लान 199 रुपयांना मिळणार आहे.

यामध्ये 28 दिवसांचे वैधता असते व अमर्यादित कॉलिंग आणि दोन जीबीचा डेटा मिळतो. तसेच एअरटेलचा जो 265 रुपयांचा प्लान होता तो घेण्यासाठी ग्राहकांना 299 रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये मर्यादित कॉलिंग तसेच दोन जीबी डेटा 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज उपलब्ध आहे.

 एअरटेलने रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केल्याबरोबर शेअर्स पोचले विक्रमी उच्चांकावर

भारतीय airtel च्या माध्यमातून रिचार्ज प्लानमध्ये वाढ करण्याची घोषणा झाल्यामुळे एअरटेलचा शेअर्स आज विक्रमी उच्चांकावर पोहोचला. आज एअरटेलच्या शेअर्सने व्यवहारादरम्यान 1536 रुपयांची पातळी गाठली. सध्या तो 0.76% घसरणीसह 1464 रुपयांवर व्यवहार करत आहे व यावर्षी या शेअर्समध्ये 44 टक्के वाढ नोंदवण्यात आलेली आहे.

 रिचार्ज प्लानच्या दरवाढीमागे तज्ञांनी दिले हे कारण

जिओ आणि एअरटेल या दोन्ही महत्त्वाच्या दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लान मध्ये वाढ करण्याची घोषणा केली. या वाढी मागील कारण देताना तज्ञांचे म्हणणे आहे की दूरसंचार कंपन्यांनी 5G सेवांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर जिओ आणि एअरटेलने 5G सेवा सुरू करण्याकरिता 2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे व अजून पर्यंत मात्र त्यांना या गुंतवणुकीवर कुठल्याही प्रकारचा परतावा मिळालेला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe