स्वस्तात मिळणाऱ्या CNG कार ! 34 किलोमीटरचे मायलेज…

आता मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने उत्पादित केले जात असून ग्राहकांचा कल देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे आहे व त्यासोबतच सीएनजी वाहनांच्या प्रमाणात देखील आता वाढ होत आहे. अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सीएनजी कार उत्पादित केल्या जात आहेत.

Updated on -

भारतातील वाहन क्षेत्राची जर सध्याची परिस्थिती पाहिली तर त्यामध्ये खूप वेगाने बदल होत असून पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त आता इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांच्या वापराकडे मोठ्या प्रमाणावर कल दिसून येत आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने या दृष्टिकोनातून हे वाहने आता परवडत नसल्याने हा बदल पाहायला मिळत आहे.

त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने उत्पादित केले जात असून ग्राहकांचा कल देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे आहे व त्यासोबतच सीएनजी वाहनांच्या प्रमाणात देखील आता वाढ होत आहे. अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सीएनजी कार उत्पादित केल्या जात आहेत.

वाहन बाजारपेठेमध्ये अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये असलेली सीएनजी कार खूप मोठ्या संख्येने आहेत. परंतु त्यातल्या त्यात कमी किमतीत मिळणाऱ्या व जास्त मायलेज देणाऱ्या सीएनजी कार देखील आहेत व ग्राहक अशाच कारच्या शोधात असतात.

यामध्ये काही प्रसिद्ध कार उत्पादक कंपन्यांच्या कार 34 किलोमीटर प्रति किलो इतके मायलेज देणारे देखील आहेत. त्यामुळे या लेखात आपण अशा काही सीएनजी कार बघणार आहोत ज्या कार स्वस्तात मिळतात व मायलेज देखील उत्तम देतात.

 या आहेत भारतातील स्वस्तात मिळणाऱ्या सीएनजी कार

1- मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी मारुती सुझुकी या प्रसिद्ध कार उत्पादक कंपनीचे सेलेरेओ सीएनजी मॉडेल असून ते परवणारे किमतीमध्ये उत्तम मायलेज देण्याच्या दृष्टिकोनातून चांगला पर्याय आहे.

ही कार ग्राहकांना 34 किलोमीटर मायलेज देते असा दावा कंपनी करते. भारतीय कार बाजारपेठेमध्ये मारुती सुझुकी सेलेरिओ सीएनजीची एक्स शोरूम किंमत सहा लाख 73 हजार रुपये आहे.

2- मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजी मारुती सुझुकी व्हॅगनारचे सीएनजी मॉडेल देखील ग्राहकांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून भारतामध्ये हे सर्वाधिक विकले जाणाऱ्या कारपैकी एक आहे.

ही कार ग्राहकांना 33 किलोमीटर मायलेज देऊ शकते व भारतीय बाजारपेठेमध्ये मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजीची एक्स शोरूम किंमत सहा लाख चार हजार रुपये इतकी आहे.

3- मारुती सुझुकी एसप्रेसो सीएनजी तुम्हाला जर नवी कोरी सीएनजी कार विकत घ्यायची असेल तर तुम्ही मारुती सुझुकीची एस प्रेसोचे सीएनजी मॉडेल ग्राहकांना एक उत्तम पर्याय ठरू शकते.

ही कार ग्राहकांना तेहतीस किलोमीटरचे मायलेज देण्याचा दावा करते. भारतीय बाजारपेठेमध्ये या कारची किंमत पाच लाख 91 हजार रुपये एक्स शोरूम इतकी आहे.

4- टाटा टियागो सीएनजी टाटा मोटर्स भारतातील प्रसिद्ध अशी वाहन उत्पादक कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून देखील अनेक महत्त्वपूर्ण आणि चांगली वैशिष्ट्य असलेल्या कार आतापर्यंत उत्पादित करण्यात आलेले आहेत.

यामध्येच उत्तम इंधन कार्यक्षमता असून टियागो सीएनजी मॉडेल या कंपनीने ऑफर केले असून ही कार ग्राहकांना 26 km चा मायलेज देण्याचा दावा करते. भारतीय बाजारामध्ये या कारची एक्स शोरूम किंमत सात लाख 54 हजार रुपये इतकी आहे.

5- मारुती सुझुकी अल्टो के 10 सीएनजी तुम्हाला जर कमीत कमी किमतीमध्ये उत्तम सीएनजी कार हवी असेल तर तुमच्याकरिता मारुती सुझुकीची अल्टो के 10 सीएनजी कार हा पर्याय उत्तम ठरतो. ही कार ग्राहकांना 34 किलोमीटरचे मायलेज देऊ शकते व भारतीय बाजारपेठेमध्ये मारुती सुझुकी अल्टो के 10 सीएनजीची एक्स शोरूम किंमत पाच लाख 73 हजार रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!