Poisonous Snake:- जगामध्ये आणि भारतामध्ये सापाच्या विविध प्रकारच्या जाती आहेत. काही जाती अशा आहेत की चावा घेतल्यानंतर क्षणात व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. त्यांचे विष इतके शक्तिशाली असते की वेळेवर उपचार मिळाले नाही तर वाचणे कठीण जाते.
अशाच प्रकारामध्ये किंग कोब्रा या जातीच्या सापाला देखील ओळखले जाते व तो इतर धोकादायक सापांच्या यादीमध्ये येतो. परंतु या जगामध्ये किंग कोब्रापेक्षा देखील काही सापांच्या जाती या खूप विषारी आहेत.

जर आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये सुमारे 300 सापांच्या प्रजाती आहेत व त्यापैकी 60 या विषारी आहेत. या विषारी जातींमध्ये प्रामुख्याने कॉमन क्रेट, रसेल वायपर, किंग कोब्रा आणि सॉ स्केल्ड वायपर म्हणजे त्यांना आपण मराठीमध्ये नाग, मन्यार, फुरसे आणि घोणस असे देखील म्हणतो.
या सापांच्या चाव्यामुळे दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होत असतो. परंतु हे झाले भारतातील विषारी साप परंतु जगातील सर्वात विषारी सापांचा विचार केला तर यामध्ये इनलँड तैपन जातीचा विशेष उल्लेख करावा लागतो आणि ही जात ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येते.
इनलँड तैपन आहे जगातील सर्वात विषारी साप
जर आपण ब्रिस्टल विद्यापीठाच्या स्कूल ऑफ केमिस्ट्रीनुसार विचार केला तर या सापाच्या शरीरामध्ये 110 मिलीग्राम विष आहे व त्याचा एक थेंब सुद्धा 100 पेक्षा जास्त लोकांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरू शकतो.
एवढेच नाही तर विषाचा एक थेंब अडीच लाखापेक्षा अधिक उंदीर देखील मारू शकतो. या सापाचे डोके आयताकृती व मध्यम आकाराचे असते व तो सकाळी खूप एक्टिव असतो. त्यामुळे या जातीच्या साप चावण्याच्या घटना सकाळी जास्त प्रमाणात दिसून येतात.
फ्रेडरिक मॅककॉय यांनी 1879 मध्ये सर्वप्रथम जगाला याबाबत माहिती करून दिली व त्यानंतर 90 वर्ष लोकांसाठी याबद्दल रहस्यच राहिले. त्यानंतर एकही नमुना या सापाचा सापडला नव्हता.परंतु 1972 मध्ये त्याचा शोध लागला.
जगातील दहा विषारी साप
आपण जगातील दहा सर्वात विषारी सापाबद्दल पाहिले तर यामध्ये इनलँड तैपन नंतर कोस्टल तैपन हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या सापाचा चाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तीला याची कुठल्याही प्रकारची जाणीव होत नाही तोपर्यंत तो अनेक वेळा चावा घेऊ शकतो.
तसेच या यादीमध्ये किंग कोब्रा हा भारतात आढळणाऱ्या सापाचा तिसरा क्रमांक लागतो. चौथ्या क्रमांकावर स्ट्रीप क्रेट आणि पाचव्या क्रमांकावर स्वा स्केल्ड वायपर या जातीचा समावेश होतो. तसेच भारतातील रसेल वायपर हा जगातील सर्वात विषारी साप सहाव्या क्रमांकावर आहे
तर सातव्या क्रमांकावर ईस्टर्न टायगर नावाच्या सापाचा समावेश होतो. आठव्या क्रमांकावर ग्रीन ट्री स्नेक आणि नवव्या क्रमांकावर फेर-डी-लान्स या सापाच्या जातीचा समावेश होतो. दहाव्या क्रमांकावर ब्लॅक मांबा हा आफ्रिकेत आढळणारा सर्वात धोकादायक सापाचा समावेश होतो.