Interesting Fact Of Crow: कावळे किती वर्षे जगतात? तुम्हाला माहिती आहे आहे का कावळ्या बद्दलच्या या इंटरेस्टिंग गोष्टी?

Published on -

Interesting Fact Of Crow:- निसर्गाच्या परिसंस्थेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी आणि इतर प्राण्यांचा समावेश होतो. प्रत्येक पक्षी व प्राण्यांचे वेगवेगळे असे वैशिष्ट्ये असतात व त्यांचा नैसर्गिक अधिवासापासून  त्यांचे खाद्य तसेच इतर गोष्टींमध्ये विविधता दिसून येते.

या सगळ्या प्राण्यांमध्ये जर आपण कावळ्याचा विचार केला तर सध्याच्या परिस्थितीत कावळा सहजासहजी आपल्याला दिसून येत नाही. अशाने पक्षांच्या प्रजाती आहेत ज्या नामशेष होण्याच्या मार्गावर असून या सगळ्या गोष्टींना मानव जबाबदार आहे. जर आपण कावळ्या बद्दल पाहिले तर हा एक मध्यम आकाराचा पक्षी असून तो त्याचे बुद्धिमत्तेसाठी देखील प्रसिद्ध आहे.

बऱ्याचदा आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो की प्राणी किंवा पक्षी किती काळ जगतात? तर या प्रश्नाचे उत्तर पाहिले तर ते पक्षानुरूप वेगवेगळे असे आहे. या अनुषंगाने आपण या लेखात कावळ्याचे वय आणि त्याच्या बद्दल काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत.

 कावळा किती वर्षापर्यंत जगू शकतो?

साधारणपणे असे म्हटले जाते की कावळा सुमारे 20 ते 30 वर्षांपर्यंत जगतो. परंतु काही अभ्यासानुसार हे वय वाढु देखील शकते. म्हणजेच कावळ्याच्या सामान्य वयाचा अंदाज लावणे तसे कठीण आहे. कावळा हा त्याचे अद्वितीय असे बालपण व दीर्घायुष्यकरिता प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की जर त्याचे नैसर्गिक राहण्याच्या ठिकाणाचे म्हणजेच अधिवासाचे रक्षण केले तर त्याचे आयुष्य आणखीन वाढू शकते.

 कावळ्या बद्दलची काही मनोरंजक तथ्य

1- कावळ्याची प्रजनन क्षमता साधारण दोन-तीन वर्षानंतर विकसित होते. हे वय या पक्षासाठी यौवनाचा दुय्यम टप्पा असून या कालावधीत ते प्रजनन करण्यास सक्षम असतात.

2- कावळे प्रजनन हंगामात तीन ते सात अंडी घालतात. एवढेच नाही तर कावळे त्यांच्या संघटनात्मक समुदायांमध्ये सामायिक प्रजनन आणि घरटे बांधण्याची प्रॅक्टिस देखील करतात व जेथे समुदायाचे सदस्य अंडी वाढवण्यासाठी एकत्रित काम करतात.

3- कावळे प्रामुख्याने संघटित समुदायांमध्ये म्हणजेच ग्रुप मध्ये राहतात व त्या माध्यमातून सामाजिक प्रणाली विकसित करतात. कावळ्यांमध्ये एकत्रितपणे काम करण्याची क्षमता आहे व ते त्यांच्या ग्रुप मधील म्हणजे समुदायातील एकमेकांशी संवाद साधू शकतात.

4- कावळ्यांचा आहार हा खूप वैविध्यपूर्ण असतो. ते प्रामुख्याने कच्चे मांस, कीटक तसेच फळे, बिया, धान्य तसेच कच्ची फळे आणि कच्च्या भाज्या देखील खातात.

5- कावळा हा अत्यंत बुद्धिमान पक्षी असून तो 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने उडू शकतो. त्याची उडण्याची क्षमता त्यांना त्यांच्या आपत्कालीन परिस्थितीत आणि अन्न शोधण्यामध्ये मदत करते.

6- कावळे एकत्रित असतात आणि त्यांच्या समुदायासोबत राहतात. ते गटागटांनी राहताना दिसून येतात. विशेष म्हणजे ते विशिष्ट शैलीत त्यांच्या जोडीदाराशी संवाद देखील साधतात.

7- कावळा हा बुद्धिमान पक्षी असून त्यांच्या संवाद साधण्याची क्षमता आहे. एक कावळा इतर कावळ्यांशी संवाद साधू शकतो आणि वेगवेगळे आवाज  आणि कृती करून तो त्यांच्या समुदायाला काही संदेश देखील देऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe