बँकेने जप्त केलेले दुकान तसेच प्लॉट, घर आता खरेदी करणे होईल सोपे! सरकारने लॉन्च केलेले नवीन पोर्टल करेल मदत

कर्ज थकीत प्रकरणांमध्ये बऱ्याचदा बँक किंवा इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून घर किंवा दुकान तसेच प्लॉट इत्यादींची जप्ती केली जाते व नंतर ई लिलाव प्रक्रिया राबवून अशा मालमत्तांची विक्री केली जाते. सार्वजनिक क्षेत्रातील ज्या काही सर्व बँक आहेत त्यांच्याकडून ई लिलाव झालेल्या विविध प्रकारच्या मालमत्ता असतात.

Ajay Patil
Published:
property

Banknet Portal:- कर्ज थकीत प्रकरणांमध्ये बऱ्याचदा बँक किंवा इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून घर किंवा दुकान तसेच प्लॉट इत्यादींची जप्ती केली जाते व नंतर ई लिलाव प्रक्रिया राबवून अशा मालमत्तांची विक्री केली जाते. सार्वजनिक क्षेत्रातील ज्या काही सर्व बँक आहेत त्यांच्याकडून ई लिलाव झालेल्या विविध प्रकारच्या मालमत्ता असतात.

त्यामुळे अशा लिलावाच्या माध्यमातून मालमत्तांची स्वस्तात खरेदी करता येणे शक्य आहे. परंतु यामध्ये समस्या अशी आहे की अशा प्रॉपर्टींचा लिलाव केव्हा होतो याबद्दलची माहिती बऱ्याच जणांना मिळत नाही व त्यामुळे अनेकांचे स्वस्तामध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्याची इच्छा असते परंतु त्यांना माहिती न मिळाल्यामुळे ही संधी गमवावी लागते.

परंतु आता ह्या समस्यावर उपाय म्हणून शुक्रवारी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे व त्यामुळे आता ई लिलावाच्या माध्यमातून विकल्या जाणाऱ्या मालमत्तांची माहिती लोकांना होणार आहे.

केंद्र सरकारने लॉन्च केले बँकनेट पोर्टल
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारच्या माध्यमातून शुक्रवारी बँकनेट नावाचे पोर्टल लॉन्च करण्यात आले असून या पोर्टलमुळे आता ई लिलावाच्या माध्यमातून जप्त केलेले घर तसेच फ्लॅट किंवा इतर मालमत्तांची विक्री करणे सोपे होणार आहे. या मालमत्तामध्ये औद्योगिक भूखंड तसेच वाहने, शेती व बिगर शेती जमिनीचा देखील समावेश असतो.

यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांच्या माध्यमातून ई लीलाव झालेल्या मालमत्तांची माहिती गोळा केली जाईल व खरेदीदार आणि गुंतवणूकदार यांना बँकनेट पोर्टलवर मालमत्ता पाहता येतील स्वस्तात मालमत्ता घेण्याची संधी या माध्यमातून मिळेल.

अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार बघितले तर बँकनेट पोर्टलवर सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून ई लिलाव केलेल्या मालमत्तांची माहिती एकत्र केली जाईल व या माहितीचा आधार घेऊन खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना प्रॉपर्टीच्या विविध श्रेणी या ठिकाणी पाहायला मिळतील.

बॅकनेट पोर्टलवर फ्लॅट, घर तसेच मोकळे भूखंड, औद्योगिक जमीन आणि इमारती तसेच दुकाने, वाहने तसेच व्यावसायिक मालमत्ता, मशिनरी व कृषी आणि बिगर शेती इत्यादी मालमत्ता लिस्ट करण्यात येणार आहेत.

लिलावात सहभाग घेणे होईल सोपे
या पोर्टलवर आता सर्व मिळकतींची संपूर्ण डिटेल एका ठिकाणी एकत्रित केल्यामुळे मालमत्तांच्या लिलावात माहिती गोळा करणे आणि लिलावामध्ये सहभागी होणे सोपे होणार आहे.

तसेच बँकांना देखील आता थकबाकी वसूल करायला मोठी मदत यामुळे होणार आहे. तसेच ज्यांना अशी प्रॉपर्टी खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांना देखील अनेक संधी या माध्यमातून निर्माण होणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe