जालना-नांदेड महामार्गबाबत मोठ अपडेट ! 20 जानेवारीपर्यंत महामार्गात जाणाऱ्या जमिनीचे मूल्यांकन सादर होणार ; ‘इतका’ मिळणार जमिनीचा मावेजा

maharashtra news

Jalna Nanded Expressway : गेल्या वर्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला झाला आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी पूर्ण झाला असून दुसरा टप्पा 2023 डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहे. यामुळे राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांदरम्यानचा प्रवास अधिकच सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान आता जालना नांदेड महामार्गाच्या कामाला गती लाभली आहे. राज्य शासनाने हा प्रस्तावित महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी मंगळवारी याबाबत एक आढावा बैठक घेतली.

या बैठकीत मोपलवार यांनी संबंधितांना या महामार्गामुळे बाधित होणाऱ्या जमिनीचे मूल्यांकन करून संबंधित बाधित शेतकऱ्यांना किती मावेजा द्यावा लागेल याची माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विशेष म्हणजे मोपलवार यांनी हे काम करण्यासाठी संबंधितांना 20 जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की जालना नांदेड महामार्ग हा जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे या महामार्गामुळे नांदेड ते मुंबई हे अंतर सहा तासात पार करता येणे शक्य होणार आहे. सद्यस्थितीला नांदेडहुन मुंबई दरम्यान प्रवासासाठी 12 तासांचा कालावधी लागतो. निश्चितचं यामुळे नांदेड जिल्ह्यातील जनतेला मोठा फायदा होणार आहे.

याशिवाय या महामार्गाचा जालना, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यांना देखील फायदा होणार आहे. या महामार्गाबाबत अधिक सांगायचं झालं तर हा महामार्ग 180 किलोमीटर लांबीचा राहणार असून संपूर्ण सिमेंट काँक्रेटचा राहणार आहे. विशेष म्हणजे या महामार्गासाठी 12000 कोटी रुपयांचा खर्च होणे अपेक्षित आहे.

ज्या पद्धतीने मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग म्हणजेच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वर्तमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो त्याच पद्धतीने जालना नांदेड महामार्ग हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आलेला एक अति महत्त्वाचा महामार्ग आहे.

यामुळे समृद्धी महामार्गाला ज्या पद्धतीने गती लाभली होती तशीच गती या जालना नांदेड महामार्गाला दिली जाईल आणि लवकरात लवकर हा महामार्ग तयार करण्याचे राज्य शासणाने ठरवले आहे.

91 गावातील जमिनीचे होणार संपादन इतका मिळणार मावेजा

जालना नांदेड महामार्गासाठी जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यातून एकूण 91 गावांमधून जमिनीचे संपादन केले जाणार आहे. विशेष म्हणजे या महामार्गासाठी जमिनीची आवश्यक संपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता महामार्गात ज्या जमीनदारांच्या तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत अशा बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे. समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने मावेजा मिळाला आहे त्याच धर्तीवर या महामार्गात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मावेजा दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe