भारतीय बाईक बाजारपेठेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनेक आकर्षक फीचर्स आणि पावरफुल अशा दमदार बाईक्स लॉन्च करण्यात येत आहेत. यामध्ये भारतीय कंपन्यांनी जशी आघाडी घेतलेली आहे. तशीच काही विदेशी कंपन्यांनी देखील बऱ्याच बाईक भारतात लॉन्च केलेले आहेत.
तसेच या ऑगस्ट महिन्याच्या कालावधीमध्ये देखील काही कंपन्यांच्या माध्यमातून आकर्षक अशा बाईक्स लॉन्च करण्यात येणार आहेत. रॉयल एनफिल्डला टक्कर देऊ शकेल अशी जावा 42 ही बाईक देखील भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली असून तिचे हे अपडेटेड मॉडेल असणार आहे.

जावाच्या या नवीन बाईकमध्ये अनेक अपग्रेड देखील करण्यात आलेले असून ही बाईक तब्बल 14 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नवीन अपडेट केल्यामुळे ह्या बाईकची स्टाईल आणि लुक्स आता पहिल्यापेक्षा अधिक खुलून दिसणार आहे.
भारतामध्ये लॉन्च झाली अपडेटेड जावा 42 बाईक
भारतीय बाईक बाजारपेठेमध्ये जावा 42 2024 साठी अपडेट केली गेलेली बाईक लॉन्च करण्यात आलेली असून या बाईकमध्ये आता अनेक अपग्रेड करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे जावाची ही बाईक 14 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली असून यामध्ये मॅट आणि ग्लॉस दोन्ही पर्यायांचा समावेश आहे.
यामध्ये सहा नवीन रंगांचा समावेश करण्यात आलेला असून यामध्ये वेगा व्हाईट, व्हायजर रेड, एस्टरॉईड ग्रे, नेबुला ब्लू आणि ओडिसी ब्लॅक व सेलिस्टीयल कॉपर मॅट इत्यादी रंगांचा समावेश आहे.
कसे आहे नवीन जावा 42 चे इंजिन?
या बाईकमध्ये नवीन 294 सीसी लिक्विड कुल्ड इंजिन देण्यात आले असून जे 27.32 बीएचपी पावर आणि 26.84 एनएम टॉर्क जनरेटर करण्यास सक्षम आहे. तसेच या बाईकमध्ये स्लीप आणि असिस्टंट क्लच देण्यात आले असून यामध्ये गुळगुळीत गिअर शिफ्टसाठी गिअर आधारित थ्रोटल मॅपिंग समाविष्ट करण्यात आलेले आहे.
काय करण्यात आलेले आहेत बदल?
अपडेटेड जावा 42 मध्ये कंपन म्हणजेच व्हायब्रेशन कमी व्हावे याकरिता कंपनीच्या माध्यमातून पुन्हा डिझाईन केलेले बॅलन्सर वजन आणि नवीन हब प्रकार बॅलन्सर गिअर देखील जोडण्यात आलेले आहेत. असेच कंपनीने मागील धक्क्यांकरिता माउंटिंग पॉईंट देखील बदलला असून त्यासोबत आरामदायी नवीन सीट जोडण्यात आलेली आहे.
सीटची उंची 788 मिमी असून या बाईकच्या बेस वेरियंटमध्ये सिंगल चॅनल एबीएस, स्पोक व्हिल्स आणि अनलॉग एलसीडी सेटअप देखील देण्यात आला आहे व त्यासोबतच जावाच्या या बाईकच्या टॉप व्हेरियंटमध्ये डिजिटल एलसीडी युनिट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
किती आहे या बाईकची भारतातील किंमत?
जावा 42 2024 साठी अपडेट करण्यात आलेली असून ज्याची किंमत एक लाख 73 हजार रुपये आणि एक लाख 98 हजार रुपये( दोन्ही एक्स शोरूम, दिल्ली) इतकी आहे. विशेष म्हणजे सुरुवातीची किंमत पूर्वीपेक्षा 16 हजार रुपये कमी असून ती अधिक परवडणारी आहे.