Jio Affordable Recharge Plan:- भारतातील आघाडीचे टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लान लॉन्च केला असून त्याची दीर्घकालीन वैधता आणि परवडणारे दर यामुळे ग्राहकांसाठी हा प्लान खूप फायद्याचा ठरणार आहे.
ग्राहकांना उत्तम अशी सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून देखील जिओचा हा प्लान महत्त्वाचा समजला जात आहे. अलीकडे आपण बघितले तर इतर टेलिकॉम कंपन्यांसोबत रिलायन्स जिओने देखील आपल्या रिचार्ज प्लानच्या किमती वाढवल्या होत्या.

या सगळ्या परिस्थितीवर अनेक ग्राहक बीएसएनएल सारख्या इतर सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे वळायला लागले व ही परिस्थिती सुधारण्यासाठी व आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळाव्या त्याकरिता जिओने 1899 रुपयांचा हा नवीन प्लॅन सादर केला आहे व हा प्लान ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक बनवून दरमहा केवळ 150 च्या सरासरी खर्च याकरता येणार आहे.
काय मिळतील ग्राहकांना फायदे?
जिओच्या या नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक प्रकारचे फायदे दिले जात आहेत. जसे की या त्यांची वैधता 336 दिवसांची आहे व यामध्ये भारतात कुठेही अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग सुविधा मिळणार आहे.
एकूण 24 जीबी हायस्पीड डेटा उपलब्ध होणार असून तीन हजार सहाशे मोफत एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे.इतकेच नाही तर संपूर्ण देशांमध्ये रोमिंग सुविधा देखील मोफत मिळणार आहे.
तसेच या प्लॅनसह जिओ आपल्या ग्राहकांना डिजिटल मनोरंजन आणि अनेक सेवांचे फायदे देखील देत आहे. ग्राहकांना त्यांच्या आवडते चित्रपट आणि टीव्ही शो हे जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा सारख्या प्लेटफॉर्मवर पाहता येणार आहेत. तसेच जिओ क्लाऊड सेवेच्या माध्यमातून ग्राहक त्यांच्या फाईल्स आणि डेटा देखील सुरक्षित ठेवू शकणार आहेत.
जिओचे इतर परवडणारे रिचार्ज प्लान
इतकेच नाहीतर जिओने इतर देखील परवडणारे असे रिचार्ज प्लान ऑफर केले आहेत.यामध्ये 779 रुपयांचा प्लान आणला असून यामध्ये 84 दिवसांची व्हॅलिडीटी व सहा जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग व 189 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता असून प्रति दिवस दोन जीबी डेटा आणि मर्यादित कॉलिंग सुविधा मिळणार आहे.