भारतीय संशोधकांचीं कमाल ! ज्वारीच्या दोन नवीन जाती विकसित, शेतकऱ्यांना मिळणार आता कमी खर्चात अधिक उत्पादन, वाचा नवीन वाणाच्या विशेषता

Ajay Patil
Published:

Jowar Farming : देशात सध्या भरडधान्याच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. भरड धान्याच्या विशेषता लक्षात घेऊन वैश्विक पटलावर भरड धान्याची मागणी देखील गेल्या काही वर्षांपासून वधारली आहे. यामुळे भरड धान्याच्या उत्पादनाला चालना मिळावी या अनुषंगाने शासनाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. सोबतच भरड धान्याच्या वेगवेगळ्या जाती शास्त्रज्ञांकडून विकसित केल्या जात आहेत.

ज्वारी हे देखील एक प्रमुख भरडधान्य पीक असून भारतीय संशोधकांनी आता ज्वारीच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून ज्वारीच्या दोन नवीन जाती विकसित केल्या आहेत. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र विजयपूर कर्नाटक येथील संशोधकांनी ज्वारीच्या या नवीन जाती विकसित केल्या आहेत. कृषी तज्ञांच्या मते ज्वारीच्या या नवीन जातीमुळे भरड धान्य उत्पादनात वाढ होणार आहे.

वास्तविक पाहता ज्वारी हे कर्नाटक सह देशातील विविध राज्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खाल्ले जाणारे धान्य आहे. अशातच आता ज्वारी उत्पादनात वाढ व्हावी म्हणून प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र विजयपूर येथे बीजीव्ही-४४ आणि सीएसव्ही-२९ या ज्वारीच्या नवीन जाती विकसित करण्यात आल्या आहेत. या नवीन जातींमुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिकचे उत्पादन या ठिकाणी मिळवता येणे शक्य होणार आहे.

दरम्यान ज्वारीच्या या नवीन जाती विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, काही चाचणी क्षेत्रात या जातीच्या ज्वारी बियाण्याची पेरणी यशस्वीरित्या झाली आहे. या ज्वारीची विशेषता म्हणजे या ज्वारीचे पीक हे इतर ज्वारीच्या तुलनेत उंच आहे. शिवाय यापासून 25% अधिक उत्पादन प्राप्त करता येणे शक्य आहे. या दोन जातींपैकी बीजीव्ही 44 ही जात काळ्या जमिनीसाठी योग्य राहणार आहे.

कापसाची काळी मृदा या जातीच्या लागवडीसाठी योग्य असून अशा शेत जमिनीमध्ये इतर ज्वारी वाणाच्या तुलनेत या वाणातून अधिकचे उत्पादन मिळवता येणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. याशिवाय, CSV-29 ही ज्वारीची नवीन जात देखील अधिक दर्जेदार उत्पादन देण्यास सक्षम राहणारा आहे. हे वाण जुन्या M-35-1 पेक्षा अधिक उत्पादन देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या नवीन जातीच्या उत्पादनाबाबत जर बोलायचं झालं तर 22 ते 25 क्विंटल पर्यंत चारा या नवीन जातीपासून मिळतो.

तसेच या नवीन जातीच्या पिकातून 8 ते 10 क्विंटल धान्य उत्पादन देखील मिळणार आहे. निश्चितच यामुळे पशुपालक शेतकरी आणि धान्याच्या उत्पादनासाठी ज्वारीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होणार आहे. या जाती अधिक उत्पादन तर देतात शिवाय या जातीच्या पिकांमध्ये इतर जातीच्या तुलनेत रोगराई आणि कीटकांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात पाहायला मिळतो.

या जातीच्या लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी या जातीपासून अधिकचे चारा उत्पादन आणि अधिकचे धान्य उत्पादन मिळत असल्याचे सांगितले आहे. निश्चितच या जातीची पेरणी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवून देण्यास मदत करणार असून यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe