‘असं’ झालं तर राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना; माजी उपमुख्यमंत्रीपुत्राचे विधान चर्चेत

juni pension yojana

Juni Pension Yojana : शासकीय कर्मचाऱ्यांचा ओ पी एस म्हणजेच जुनी पेन्शन योजना हा विषय मोठा जिव्हाळ्याचा. जसं की आपणास ठाऊकच आहे 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना OPS योजना लागू न करता एनपीएस म्हणजेच नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र कर्मचाऱ्यांकडून ही नवीन योजना रद्द करत पुन्हा एकदा जुनी योजना कार्यान्वित करावी अशी मागणी जोर करत आहे.

दरम्यान या जुन्या पेन्शन योजनेबाबत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी याबाबत एक मोठं विधान केलं आहे. काल सांगली मध्ये झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला संबोधित करताना रोहित पाटील यांनी हिमाचल प्रदेश मधील एक किस्सा सांगून असं झालं तरच राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होईल असं म्हटलं आहे.

रोहित पाटील यांनी कालच्या मोर्चात बोलताना असं सांगितलं की, हिमाचल प्रदेश मध्ये जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्र्यांना लोकांनी घरी बसवल आहे. यामुळे ज्या पद्धतीने हिमाचल प्रदेश मध्ये घडलं आहे तसं महाराष्ट्रात घडलं तरच जुनी पेन्शन योजना लागू होईल असं विधान रोहित पाटील यांनी केलं असून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी तोफ डागली आहे.

रोहित पाटील यांचे हे विधान सध्या राज्यभर चर्चिले जात आहे. हिमाचल प्रदेश मध्ये ज्या पद्धतीने जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून भाजपला सत्ताबाहेर जावं लागलं तसंच महाराष्ट्रात देखील ही योजना लागू झाली नाही तर भाजपला सत्ता बाहेर जावं लागेल असं कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देखील सांगितलं जात आहे. सध्या राज्यभर जुनी पेन्शन योजनेवर वनवा पेटला आहे.

कर्मचारी उद्यापासून या आपल्या प्रमुख मागणीसाठी बेमुदत संपावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जुनी पेन्शन योजनेबाबत नेमका काय निर्णय होतो याकडे कर्मचाऱ्यांसहित संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe