2025 Kawasaki Ninja ZX-4RR bike:- भारतीय बाईक बाजारपेठेमध्ये प्रामुख्याने हिरो, होंडा आणि बजाज सारख्या कंपन्यांच्या बाईक्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून जवळपास भारतीय ग्राहकांमध्ये या तिन्ही कंपन्यांच्या बाईक्स प्रचंड लोकप्रिय आहेत. परंतु यामध्ये काही विदेशी बाईक निर्मात्या कंपन्या देखील गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय बाईक बाजारपेठेवर एक प्रकारे वर्चस्वच नाही तर ग्राहकांमध्ये देखील एक वेगळे स्थान निर्माण करून आहेत.
त्यातीलच एक प्रमुख नाव म्हणजे जपानी बाईक निर्माता कंपनी असलेल्या कावासाकी हे होय. या कंपनीने भारतीय बाईक बाजारामध्ये आतापर्यंत चांगली वैशिष्ट्य असलेल्या बाईक ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत व त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे आता या कंपनीने आपली जुनी बाईक नवीन अपडेटसह भारतीय बाजारात लॉन्च केली आहे व या बाईचे नाव आहे कावासाकी निंजा ZX-4RR हे होय.
कसे आहे 2025 कावासाकी निन्जा ZX-4RR बाईकचे इंजिन?
या बाईकमध्ये 399 सीसी, लिक्विड कुल्ड, इन लाईन फोर इंजिन वापरण्यात आले असून हे इंजिन 77 बीएचपीची पावर आणि 29 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच हे इंजिन रॅम एअरसह 80 बीएचपी पावर देखील जनरेट करू शकते. तसेच हे इंजिन सहा स्पीड गिअरबॉक्स सह कनेक्ट केलेले आहे.
कसे आहेत या बाईकचे फीचर्स?
नवीन कावासाकी निन्जा ZX-4RR या बाईकमध्ये अनेक अपडेट करण्यात आली असून यामध्ये स्टायलिश शार्प फेअरिंग, ट्वीन एलईडी हेडलाइट्स आणि अपस्वेफ्ट टेल देण्यात आला आहे व त्याच्या बॉडीवर्कच्या खाली एक हाई टेंन्सिल स्टील ट्रेलिस फ्रेम दिली आहे. तसेच यूएसडी फोर्क आणि बॅक लिंक मोनोशॉक द्वारे निलंबित केले जाते.
तसेच या बाईकला 17 इंची हिल्स देण्यात आली असून ब्रेकिंग करिता समोर 290 मीमी ड्युअल डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला 220m डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहे. तसेच ही बाईक स्पोर्ट, रन, रोड आणि कस्टम अशा चार राईड मोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच या बाईकमध्ये डुएल चॅनेल एबीएस व ट्रॅक्शन कंट्रोल देखील देण्यात आलेले आहे.
किती आहे या बाईकची किंमत?
2025 कावासाकी निन्जा ZX-4RR भारतामध्ये नऊ लाख बेचाळीस हजार रुपयांच्या एक्स शोरूम किमतीत लॉन्च करण्यात आली असून जुन्या मॉडेल च्या किमती पेक्षा जवळपास 32 हजार रुपयांनी ही किंमत जास्त आहे. विशेष म्हणजे या बाईकची आता बुकिंग देखील सुरू करण्यात आलेली आहे.