वास्तुशास्त्र हे एक महत्त्वाचे असे शास्त्र असून यामध्ये वास्तू म्हणजेच घराच्या बांधकामापासून तर घराच्या अंतर्गत व बाह्यरचनेपासून अनेक गोष्टींविषयी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. यामध्ये तुम्ही घराची रचना कशी करावी? म्हणजेच घरातील स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावे किंवा कोणता फोटो कोणत्या दिशेला लावावा? घरामधील बेडरूमची रचना कोणत्या दिशेला असावी? याबद्दलची अनेक प्रकारची माहिती यामध्ये दिलेली असते.
वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घराची अंतर्गत रचनेमध्ये जर काही बदल झाला तर त्याला आपण वास्तुदोष असे म्हणतो व अशा दोषांमुळे घरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. आपल्याला माहित आहे की बऱ्याचदा आपण भरपूर प्रमाणात पैसे कमवतो. परंतु घरामध्ये पैसा टिकतच नाही.

अशा प्रकारच्या समस्या या वास्तुदोषामुळे उद्भवतात असे वास्तुशास्त्र म्हणते. अशा दोषांच्या निराकरणासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना देखील केल्या जातात. परंतु बऱ्याचदा अपेक्षित असा सकारात्मक परिणाम दिसून येत नाही. या सगळ्या समस्या वर वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत. जे उपाय केल्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते व देवी लक्ष्मीची कृपा देखील कायम राहू शकते.
घरात या गोष्टी ठेवल्या तर दिसून येतात शुभ आणि फलदायी परिणाम
1- घरातील देवघरात अखंड नारळ ठेवणे- प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर अर्थात देव्हारा असतोच. याबद्दल वास्तुशास्त्र सांगते की देव्हाऱ्यामध्ये जर अखंड नारळ ठेवले तर ते अत्यंत पवित्र मानले जाते व इतकेच नाही तर त्याला देवी लक्ष्मीचे रूप देखील मानतात. इतकेच नाही तर अखंड नारळ घरात ठेवल्यामुळे वास्तुदोष असेल तरी तो नाहीसा होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा नेहमी घरामध्ये राहते व पैशांच्या संबंधित समस्या येत नाही.
2- श्री गणेशाची मूर्ती ठेवणे- आपल्याला माहित आहे की कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपण गणपतीचे पूजन करून करतो. गणपतीला प्रथम पूज्य देवता मानले गेले आहे.
यासंबंधी जर आपण वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घरातील वास्तुदोष दूर करण्याकरिता घराचे जे मुख्य प्रवेशद्वार असते त्या ठिकाणी गणेशाची मूर्ती ठेवणे गरजेचे आहे. यामुळे घरातील धन आणि सुखाच्या संबंधित असलेल्या समस्या दूर होतात.
3- देवी लक्ष्मी आणि कुबेर यांचा फोटो- कुबेर आणि देवी लक्ष्मी यांना संपत्तीची देवता मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घरात देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे फोटो असणे खूप गरजेचे आहे. धनाच्या वाढीकरिता घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो असणे गरजेचे आहे व त्याची नियमित पूजा करणे देखील महत्त्वाचे आहे.
4- घरात शंख ठेवणे- शंख हा खूप महत्त्वपूर्ण समजला जातो व घरामधील वास्तुदोष दूर करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये अद्भुत क्षमता असल्याचे देखील मानले गेले आहे. ज्या घरामध्ये शंख नियमितपणे वाजवला जातो त्या ठिकाणी सकारात्मक एनर्जी कायम वास करते.
असे म्हटले जाते की, शंख देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्याने घरामध्ये जर शंख असेल तर देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते.तसेच घरात शंख असल्यास वास्तुदोष येत नाही व पैशाशी संबंधित समस्या देखील दूर होतात.
5- बासरी- वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी बासरी चांगला पर्याय आहे.घरात सकारात्मक ऊर्जा किंवा वातावरण असणे हे खूप महत्त्वाचे असते व त्याचेच प्रतीक बासरीला मानले गेले आहे.
पैशांच्या अडचणी पासून मुक्तता करण्यासाठी देखील घरात बासरी ठेवणे आवश्यक असल्याचे म्हटले जाते व अशा घरांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. असे म्हटले जाते की देव्हाऱ्यामध्ये जर बासरी ठेवली तर व्यवसाय तसेच शिक्षण व नोकरीतील अडथळे दूर व्हायला मदत होते.
(टीप- वरील माहिती वाचकांसाठी माहिती म्हणून सादर करण्यात आलेली आहे. या माहितीचे अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचे समर्थन अथवा या माहितीविषयी कुठलाही दावा करीत नाही.)