Snake Information:- भारतात आणि जगामध्ये अनेक सापांच्या जाती असून त्यातील बहुसंख्य जाती या बिनविषारी आहेत. हीच परिस्थिती भारतात देखील असून भारतामध्ये देखील सापांच्या बहुतेक जाती आपल्याला दिसून येतात. परंतु त्यातील थोड्याच जाती या विषारी आहेत.
भारतामध्ये आढळणाऱ्या विषारी जातींचा विचार केला तर यामध्ये इंडियन कोब्रा, किंग कोब्रा, घोणस, फुरसे तसेच मन्यार या जातींचा प्रामुख्याने विषारी वर्गात समावेश होतो. यामध्ये जर आपण कोब्रा या जातीचा विचार केला तर हा सर्वात खतरनाक सांपापैकी एक समजला जातो.
असे म्हटले जाते की जर कोब्रा जातीच्या सापाने चावा घेतला तर जीव वाचण्याची शाश्वती नसतेच. भारतामध्ये कोब्रा आणि किंग कोब्रा हे दोन प्रकार आढळून येतात व यांच्यामध्ये फरक देखील आहे. त्यामुळे या लेखामध्ये आपण या दोघ सापांमध्ये कोणता साप जास्त धोकादायक आहे? याबद्दलची माहिती घेऊ.
किंग कोब्राची लांबी किती असते?
जर आपण किंग कोब्राची लांबी पाहिली तर ती तेरा फूट लांब असू शकते तर इंडियन कोब्रा चार ते सात फूट लांब असतो. मागील काही दिवसा अगोदर उत्तराखंड राज्याच्या परिसरामध्ये एक मोठ्या आकाराचा किंग कोब्रा आढळून आला होता व त्याची लांबी 23 फूट 9 इंच इतकी होते. याबाबत वन्यप्राणी नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की तो जगातील सर्वात लांब किंग कोब्रा होता. अक्षरश: या सापाची लांबी मोजण्याकरिता तीन वेळा मापन करावे लागलं होतं.
कोणता साप जास्त धोकादायक आहे?
या दोघांमध्ये जर आपण धोकादायक असलेला सापाचा विचार केला तर यामध्ये इंडियन कोब्राचे विष जास्त धोकादायक समजले जाते. किंग कोब्राकडे शिकार करण्यासाठी शरीरात सर्वात जास्त विष सोडण्याची क्षमता आहे. त्यामुळे विषाच्या बाबतीत दोघे सारखेच आहेत.
या दोघेही सापांनी चावल्यावर वाचण्याची शक्यता खूपच कमी असते आणि जर या दोघा सांपापैकी कोणताही साप चावला तरी पंधरा मिनिटाच्या आत माणूस मरू शकतो.
विशेष म्हणजे यातील किंग कोब्रा जातीच्या सापाने एका वेळेस विष सोडले तर अकरा लोकांचा मृत्यू होऊ शकतो व त्या तुलनेमध्ये इंडियन कोब्रा एकावेळी दहा लोकांचा जीव घेऊ शकतो.
किंग कोब्रा किती वर्षे जिवंत राहू शकतात?
जर आपण दातांची तुलना केली तर किंग कोब्राचे दात हे इंडियन कोब्राच्या दातांच्या तुलनेमध्ये दोन इंच मोठे असू शकतात. इंडियन कोब्रा नेहमीच पसरलेल्या अवस्थेत बसतात व त्यामुळे त्यांची चावण्याची शक्यता अधिक असते.
किंग कोब्राला मोठ्या आकाराचा फणा असतो व त्याच्यावर सफेद रंगाच्या रेषा असतात.किंग कोब्राचे वैशिष्ट्य म्हणजे तो त्याच्या शरीराचा एक तृतीयांश भाग उंच उचलू शकतो. महत्वाचे म्हणजे हे दोघेही साप जवळपास 20 वर्षापर्यंत जिवंत राहू शकतात.