Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरु झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू केली होती, या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
या योजनेची घोषणा गेल्या वर्षी जून महिन्यात झाली आणि जुलै महिन्यापासून या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळू लागला. आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना जुलै 2024 ते जून 2025 या कालावधीमधील एकूण 12 हप्ते मिळालेले आहेत.

म्हणजेच ही योजना सुरू होऊन बारा महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे आणि लवकरच आता या योजनेचा तेरावा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. खरंतर या योजनेचा जून महिन्याचा हप्ता हा जुलै च्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्यासाठी 30 जून रोजी 3600 कोटी रुपयांच्या निधी वितरणास सरकारकडून मान्यता मिळाली होती. यानंतर जुलै च्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. दरम्यान, आता जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात या योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जमा केला जाईल अशी माहिती समोर आली आहे.
पण राज्यातील काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही अशी सुद्धा तक्रार केली जात आहे. अशी सारी परिस्थिती असतानाच आता राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातून एक मोठी माहिती हाती आली आहे.
जिल्ह्यातील हजारो महिलांचे पंधराशे रुपये कायमचे बंद
खरे तर ही योजना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झाली आणि यामुळे या योजनेच्या महिलांनी अर्ज केला त्यांना सरसकट लाभ मिळाला. सुरुवातीच्या टप्प्यात जाचक अटी शिथिल करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात राज्यातील महिलांना योजनेचा लाभ मिळाला.
मात्र या योजनेमुळे शासनाची तिजोरी खाली होत असल्याने अर्जाला कात्री लावणे आता सुरू करण्यात आले आहे. विदर्भ विभागातील यवतमाळ जिल्ह्यातही 27 हजाराहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 27 हजार 317 लाडक्या बहिणींचा पत्ता कट करण्यात आला असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
ज्या महिलांच्या घरी ट्रॅक्टर वगळता कोणत्याही प्रकारचे चारचाकी वाहन आहे, जे लाभार्थी आयकर भरणारे आहेत, नमो शेतकरी सन्मानचे लाभार्थी आहेत, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, एकाचं कुटुंबातील लाभार्थी अर्जदारांची संख्या जास्त आहेत अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.