मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या यशानंतर महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारने आणली नवीन योजना !

राज्यातील महिलांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून लाडकी बहिण योजनेच्या अभूतपूर्व यशानंतर एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या नव्या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना पिठाच्या गिरणीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाईल.

Published on -

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली.

गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. म्हणजेच एका वर्षात या योजनेच्या माध्यमातून एका पात्र महिलेला 18000 रुपयाचा लाभ दिला जातोय.

खरंतर या योजनेची सुरवात 2024 मध्ये झाली आणि या योजनेचा प्रत्यक्षात लाभ जुलै 2025 पासून मिळतोय. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण दहा हप्ते मिळाले आहेत आणि मे महिन्याचा अकरावा हप्ता येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

या योजनेला राज्यातील महिलांकडून चांगला अबूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे आणि याच योजनेच्या यशानंतर आता राज्यातील महिलांसाठी आणखी एका नव्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत पिठाच्या गिरणी साठी महिलांना अनुदान दिले जात आहे. दरम्यान आज आपण याच योजनेच्या संदर्भातील सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी आहे मोफत पीठ गिरणी योजना?

महाराष्ट्रातील गरीब व गरजू महिलांसाठी सरकारकडून 90% अनुदानावर पिठाची गिरणी उपलब्ध करून दिली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे या अंतर्गत राज्यातील महिलांना स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करता यावा.

या योजनेच्या माध्यमातून महिला 90 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी घेऊन स्वतःचा फ्लोर मिलचा व्यवसाय सुरू करू शकणार आहेत. या अंतर्गत महिलांना 90 टक्के अनुदानावर गिरणी मिळते.

म्हणजे जर समजा गिरणीची किंमत दहा हजार रुपये एवढी असेल तर महिलांना 9000 रुपये एवढे अनुदान मिळेल आणि उर्वरित एक हजार रुपये त्यांना स्वतः भरावे लागतील.

 योजनेच्या पात्रता कशा आहेत

 या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील महिलांना अर्ज सादर करता येणार आहे. तसेच या योजनेचा लाभ राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजेच एससी आणि एसटी कॅटेगिरी मधील महिलांनाच मिळणार आहे इतर प्रवर्गातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय 18 ते 60 वर्षे यादरम्यान असावे. तसेच महिलांचे एकूण कौटुंबिक उत्पन्न 1.20 लाखांपेक्षा कमी असावे. या योजनेचा अधिका-अधिक लाभ ग्रामीण भागातील महिलांना दिला जाणार आहे.

कोण कोणती कागदपत्रे लागणार?

अर्जदार महिलेचे आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी पुरावा, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँकेचे पासबुक आणि गिरणी खरेदीचे कोटेशन या कागदपत्रांसह महिलांना अधिकृतरित्या अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर केल्यानंतर मग पात्र महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News