‘या’ राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींचा हप्ता 250 रुपयांनी वाढला, कधीपासून मिळणार लाभ?

लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे लाडक्या बहिणींचा हफ्ता पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. दरम्यान आता आपण कोणत्या लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवण्यात आला आहे याचाच आढावा या लेखातून घेणार आहोत. 

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत जुलै 2024 पासून प्रत्यक्षात लाभ मिळतोय. 

जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 2025 या कालावधीमधील एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आणि या योजनेचा पुढील बारावा हप्ता जून अखेर पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होईल अशी खात्रीलायक बातमी समोर येत आहे.

खरंतर, सध्या राज्यातील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये प्रति महिना याप्रमाणे लाभ दिला जातोय. पण, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीकडून लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील अशी घोषणा करण्यात आली आहे.

मात्र अजून पर्यंत 2100 रुपयां संदर्भात सरकारकडून कोणताच निर्णय झालेला नाही. अशातच आता मध्यप्रदेश राज्यातील लाडली बहना योजनेच्या पात्र महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

खरंतर महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना ही मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू झाली आहे. दरम्यान आता मध्य प्रदेश राज्यातील लाडक्या बहिणींच्या हफ्त्यात वाढ करण्यात आली आहे. 

किती वाढला हफ्ता?

मध्यप्रदेश राज्यातील लाडली बहना योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांचा हप्ता अडीचशे रुपयांनी वाढवण्यात आला आहे. खरंतर मध्य प्रदेश राज्यातील लाडक्या बहिणींना सुरुवातीच्या टप्प्यात एक हजार रुपये दिले जात होते.

पण सध्या एमपी मधील लाडक्या बहिणींना 1250 रुपये दिले जात आहेत. महत्त्वाची बाब अशी की आता पुन्हा एकदा मध्यप्रदेश राज्यातील लाडक्या बहिणींचा हप्ता अडीचशे रुपयांनी वाढवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

म्हणजेच मध्य प्रदेश राज्यातील लाडक्या बहिणींचा हप्ता आता पंधराशे रुपयांचा होणार आहे आणि याचा लाभ रक्षाबंधनापासून लाडक्या बहिणींना मिळेल अशी मोठी घोषणा मध्य प्रदेश राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे. खरे तर मध्य प्रदेश राज्यातील लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ता दिला जाईल अशी घोषणा तेथील सरकारने केली आहे.

दरम्यान आता याच अनुषंगाने एमपी सरकारकडून तेथील लाडक्या बहिणींचा आता अडीचशे रुपयांनी वाढवण्यात आला असून 2028 पर्यंत लाडक्या बहिणींना 3000 रुपये प्रति महिना लाभ दिला जाईल असा दावा मध्य प्रदेश राज्य शासनाकडून केला जातोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!