Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या वर्षी सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरवर्षी 18 हजार रुपयांचा लाभ दिला जातोय म्हणजेच दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.
आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 11 हप्ते देण्यात आले आहेत आणि आता महिला या योजनेच्या पुढील हफ्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. खरे तर या योजनेचा पहिला हप्ता जुलै 2024 मध्ये मिळाला होता, यानंतर मग प्रत्येक महिन्याला या योजनेचा हप्ता दिला जातोय.

आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 या कालावधीमधील एकूण 11 हप्ते पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. दरम्यान मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
दुसरीकडे आता जून महिन्यात संपण्यास अवघे सहा-सात दिवस बाकी आहेत यामुळे जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा सुद्धा सवाल महिलांकडून उपस्थित केला जातोय. दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.
जून आणि जुलै महिन्याचे पैसे सोबतच मिळणार का?
खरे तर गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना जून महिन्याची प्रतीक्षा आहे. मात्र अजून सरकारकडून या संदर्भात कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही.
जून महिना संपण्यास आता फक्त सहा ते सात दिवस बाकी आहेत आणि असे असतानाही जून महिन्याच्या हफ्त्याबाबत सरकारकडून कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही, यामुळे जून आणि जुलै या दोन महिन्यांचे हप्ते सोबतच दिले जाऊ शकतात आणि हे दोन्ही हप्ते पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये खात्यात जमा होतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे असे घडले तर यात नवल वाटण्यासारखे काहीही नाही, कारण की या योजनेच्या माध्यमातून पूर्वीदेखील अशा पद्धतीने दोन महिन्यांचे पैसे सोबत देण्यात आले आहेत.
यामुळे जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे म्हणजेच बारावा आणि तेरावा हफ्ता जुलै महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
पण या संदर्भात अजून तरी अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे खरंच या योजनेचे दोन्ही हफ्त्याचे पैसे जुलै महिन्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.