लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! जुलैचा हप्ता जमा होण्याआधीच गूड न्यूज आली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याआधीच एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. खरे तर जुलै महिन्याचा हप्ता या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होऊ शकतो आणि या हप्त्यासोबत काही महिलांना एक मोठी भेट दिली जाईल.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहिण योजनेबाबत बोलायचं झालं तर या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून झाली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली आणि जुलै महिन्यापासून या योजनेच्या पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाऊ लागलेत.

या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत एकूण 12 हप्ते देण्यात आले आहेत. या योजनेला नुकताच बारा महिन्यांचा काळ पूर्ण झाला असून पात्र महिलांच्या खात्यात जुलै 2024 ते जून 2025 या कालावधीमधील एकूण 12 हप्ते वर्ग करण्यात आले आहेत.

या योजनेचा बारावा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. बाराव्या हप्त्यासाठी आवश्यक 3600 कोटी रुपयांच्या निधी वितरण 30 जून 2025 रोजी मान्यता मिळाली होती आणि त्यानंतर जुलै च्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 12 व्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झाली.

मात्र या योजनेचा बारावा हप्ता राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नसल्याची तक्रार देखील समोर आलेली आहे. दरम्यान अशी सगळी परिस्थिती असतानाच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी जुलै चा हप्ता जमा होण्याआधीच एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. 

या महिलांना मिळणार तीन हजार रुपयांचा हप्ता 

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता सोबतच दिला जाऊ शकतो. म्हणजेच जून आणि जुलै या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये अशा महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

तथापि, या संदर्भात सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही यामुळे खरंच जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचा हप्ता सुद्धा मिळणार का ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे. 

जुलैचा हफ्ता कधी मिळणार?

जून महिन्याचा हप्ता प्रत्यक्षात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. यामुळे जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळणार की काय असा सवाल आहे.

पण काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये जुलैचा लाभ जुलै महिन्यातच मिळेल असे बोलले जात आहे. जुलै महिन्याचा हप्ता हा या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!