मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी मिळणार ? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली मोठी माहिती

लाडक्या बहिणींना लवकरच एक गुड न्यूज मिळणार आहे. एप्रिल 2025 चा लाभ कधी मिळणार ? याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. तसेच, मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत एक नवं अपडेट दिल आहे.

Updated on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची घोषणा गेल्या वर्षी जून महिन्यात झाली अन या योजनेचा लाभ जुलै महिन्यापासून मिळत आहे.

या अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 9 हप्ते मिळाले आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च 2025 या नऊ महिन्यांचा लाभ मिळाला आहे.

एप्रिल महिन्याच्या हफ्त्याची आतुरता

यातील फेब्रुवारी आणि मार्च 2025 या दोन महिन्यांचा लाभ एकाच वेळी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला. 8 मार्च 2025 रोजी अर्थातच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारने या योजनेच्या दोन हप्त्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आणि जवळपास 12 मार्चपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींना हा लाभ मिळाला. आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हफ्त्याची आतुरता आहे. महत्त्वाचे म्हणजे एप्रिल महिन्याचा पैसा लाडक्या बहिणींना कधीपर्यंत मिळू शकतो या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

केव्हा मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता?

फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आठ मार्च रोजी महिलांना मिळाला यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता हा देखील 8 एप्रिल पासून महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता मध्यंतरी वर्तवण्यात आली होती.मात्र असे काही घडले नाही आणि आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे.

लाडक्या बहिणींच्या खात्यात…

यावर्षी अक्षय तृतीयाचा मोठा सन 30 एप्रिल 2025 रोजी साजरा होईल. दरम्यान, याच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा पैसा जमा होण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आली आहे. तथापि या संदर्भात अजून तरी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे एप्रिलचा हप्ता नेमका कधी मिळणार? याची अधिकृत तारीख कधी समोर येणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.

कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया

तत्पूर्वी या योजनेच्या बाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींवर पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून, सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी म्हटले होते.

11 लाख महिलांचे अर्ज अपात्र

या योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी जवळपास 11 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून एप्रिलचा हप्ता कधी मिळणार ? हा प्रश्न उपस्थित होत होता आणि आता एप्रिलचा हप्ता महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची नवी माहिती समोर आली आहे.

हे पण वाचा : पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक बदलणार ? वाचा डिटेल्स

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News