मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी ! मंत्री गिरीश महाजनांनी सांगितला सरकारचा प्लॅन

लाडक्या बहिणींसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे 2,100 रुपयांबाबत. लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांचा लाभ मिळणार की नाही याबाबत मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मोठे वक्तव्य समोर आल आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली.

जुलै 2024 पासून या योजनेअंतर्गत प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना लाभ दिला जातोय. या अंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. जुलै 2024 ते मे 2025 या कालावधीमधील एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला वर्ग करण्यात आला आहे यामुळे जून महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार? जून महिन्यात जमा होणार की जुलै महिना उजाडणार असे अनेक प्रश्न लाभार्थ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान जून महिन्याचा बारावा हप्ता हा 15 ते 20 जून दरम्यान जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे या काळात जून महिन्याचा हप्ता जमा होतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जून महिन्याचा हप्ता जमा होण्याआधीच मात्र या योजनेच्या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी मोठे भाष्य केले आहे.

खरेतर, विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीकडून लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी 2,100 रुपये दिले जातील अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता नवीन सरकार स्थापित होऊन बरेच दिवस उलटले आहेत तरीही 2100 रुपयांबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे मंत्री गिरीश महाजन यांना 2100 रुपयांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. 

काय म्हणालेत मंत्री गिरीश महाजन ?

जळगावात भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत असे सांगितले की, मला वाटत देश आता एवढा विकासाच्या मार्गानं चाललाय. नरेंद्र मोदींचा कार्यकाळ या वर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.

सेवा, सुशासन, गरीब कल्याण या योजना किती वेगानं पुढे चाललेत हे बघा. लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये दिले आहेत. पूर्वी कुणी देत नव्हतं. ठीक आहे, निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं 2100 रुपये देऊ, अजून वर्षही झालं नाही. फक्त सहा – सात महिने झाले आहेत. आम्ही तेही देऊ, सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करणार आहे.

सध्या आर्थिक अडचण आहे. पण असे असतांनाही नियमितपणे पैसे लाडक्या बहिणींना दिले जात आहेत. लाडक्या बहिणी आमच्यावर खूश आहेत, असं सुद्धा गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितल. एकंदरीत गिरीश महाजन यांनी भविष्यात 2100 रुपयांबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकतो असा विश्वास व्यक्त केलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!