लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! फक्त ‘या’ महिलांनाच मिळणार 1500 रुपयांचा लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना लवकरच जून महिन्याचा लाभ दिला जाणार असून हाच जून महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार या संदर्भातील एक यादी हाती आली आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : तुम्हीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता का? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरेतर, महाराष्ट्रातील महिलांसाठी गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आता फक्त या योजनेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे. आता राज्य सरकारने महाराष्ट्रातील लाखो महिलांचे अर्ज बाद केले असून त्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. दरम्यान आता आपण या योजनेचा कोणत्या महिलांना लाभ मिळणार ? याचा आढावा घेणार आहोत.

या महिलांनाच मिळणार नाही लाभ 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारकडून काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना दिला जातोय. तसेच याचा लाभ ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशाच कुटुंबातील महिलांना दिला जातोय.

ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळत नाही. इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना याचा लाभ दिला जात नाही. सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांना तसेच सरकारी कर्मचारी असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळत नाही.

दरम्यान आता या योजनेच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील महिन्यात तब्बल अडीच हजार महिलांना सरकारी कर्मचारी असूनही लाभ घेत असल्याकारणाने या योजनेतून बाद करण्यात आले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे सरकारने अशा अपात्र लाभार्थींनी आपले अर्ज त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असे आवाहन सुद्धा केलेले आहे. 

जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार 

मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेच्या बाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या वर्षी सुरू झाली असून या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.

या योजनेअंतर्गत जुलै 2024 पासून प्रत्यक्षात लाभ मिळतोय. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 2025 या कालावधीमधील पैसा वितरित करण्यात आला आहे.

महत्त्वाची बाब अशी की जून महिन्याचा पैसा हा 20 जूनच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तथापि या संदर्भात अजून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही यामुळे या योजनेचा पैसा जून महिन्यात येणार की जुलै महिन्यात येणार ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!