Ladki Bahin Yojana : गेल्या शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेची लोकप्रियता गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात असून जुलै 2024 पासून या योजनेचे पैसे मिळत आहेत.
आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 11 हप्ते मिळाले आहेत आणि बारावा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो या संदर्भातही नवीन माहिती समोर आली आहे. या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला आणि आता जून महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

या पुढील हप्त्याची संभाव्य तारीख सुद्धा समोर येत आहे. अशी सारी परिस्थिती असतानाच मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांची चिंता वाढणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान आता आपण कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही याबाबतची सविस्तर माहिती आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.
कोणत्या महिलांना कधीच मिळणार नाही लाडकी बहिण योजनेचा लाभ
लाडकी बहीण योजनेच्या नियमांनुसार, ज्या महिलांचे वार्षिक कुटुंब उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही. मात्र, अनेक महिलांनी खोटे दस्तऐवज सादर करत लाभ घेतला असल्याची बाब अलीकडेच उघडकीस आली आहे.
याशिवाय सरकारी कर्मचारी असणाऱ्या तसेच सरकारी कर्मचारी कुटुंबातून येणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही पण राज्यातील तब्बल अडीच हजार महिला सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
यासोबतच आयकर भरणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत नाही मात्र या योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी काही महिला आयकर भरतात, त्यांचेही उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आहे. सरकारने आता आयकर विभागाच्या मदतीने उत्पन्न पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयकर विभाग लाभार्थ्यांची माहिती सरकारला पुरवणार असून, निकष ओलांडणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे.
सोबतच ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही. यामुळे आता या योजनेच्या या सर्वच निकषांची काटेकोरपणे पडताळणी या ठिकाणी केली जाणार आहे आणि यामुळे या योजनेच्या लाभार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे.
जून महिन्याचा लाभ कधी मिळणार
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर जून महिन्याचा लाभ हा जून महिन्यातच दिला जाणार आहे. जून महिन्याचा बारावा हफ्ता साधारणतः 15 ते 20 जून दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तथापि या संदर्भातील अधिकृत माहिती अजूनही हाती आलेली नाही त्यामुळे 15 ते 20 जून दरम्यान खरंच लाडक्या बहिणींच्या खात्यात बारावा हप्ता जमा होणार का ही गोष्ट पाहण्यासारखी राहणार आहे. ज्याप्रमाणे मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये जमा झाला तसाच जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये जमा होणार की काय हे सुद्धा पाहणे उत्सुकतेचे राहील.