जून आणि जुलै महिन्याचा हप्ता सोबतच मिळणार, पण ‘या’ महिलांना योजनेतून काढले जाणार !

लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आज आपण या योजनेचा राज्यातील कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही याबाबतची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर ही राज्य शासनाची एक महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेची घोषणा गेल्या वर्षी जून महिन्यात करण्यात आली होती. मात्र या योजनेचा प्रत्यक्षात लाभ जुलै 2024 पासून दिला जातोय. या अंतर्गत जुलै 2024 पासून दर महा 1500 रुपये दिले जातात.

आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 2025 या एकूण 11 महिन्यांचा लाभ लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला आहे आणि महत्त्वाची बाब अशी की, लवकरच या योजनेचा पुढील हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल अशी बातमी समोर येत आहे. 

कधी मिळणार पुढचा हफ्ता

मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात जून आणि जुलै महिन्याचा हफ्ता म्हणजेच बारावा आणि तेरावा हप्ता एकाच वेळी दिला जाऊ शकतो. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना जून आणि जुलै या दोन महिन्यांचे पैसे सोबतच दिले जातील असे बोलले जात आहे.

म्हणजे सहा जुलै च्या सुमारास या दोन्ही हप्त्यांचा लाभ लाडक्या बहिणींना मिळू शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. तथापि या संदर्भात अजून तरी कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही.

यामुळे जून आणि जुलै या दोन्ही हफ्त्याचा लाभ आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर खरच दिला जाईल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान या योजनेचा लाभ नियमात बसणाऱ्या लाडक्या बहिणींनाच दिला जाणार आहे. म्हणजे ज्या महिला या योजनेच्या नियमात बसत नाहीत त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.

या महिलांना लाभ मिळणार नाही

या योजनेचा लाभ 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांनाच दिला जाणार आहे, अर्थात 21 वर्षांपेक्षा कमी आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही. 

वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही.

सरकारी नोकरदार असणाऱ्या कुटुंबातील महिलांना, तसेच सरकारी नोकरीत कार्यरत असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही. 

ज्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्या कुटुंबातील महिला यासाठी अपात्र ठरतील. 

जर समजा कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत किंवा भारत सरकारमध्ये नियमित कर्मचारी असतील तर त्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही.

कुटुंबातील एखादा सदस्य निवृत्तीनंतर पेन्शन घेत असेल तर अशा कुटुंबातील महिला देखील या योजनेपासून वगळल्या जातील.  

जर इतर कोणत्याही आर्थिक योजनेतून महिलांना आधीपासूनच लाभ मिळत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

आजी – माजी आमदार खासदार असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही. 

तसेच जर कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, मंडळ, संचालक, महामंडळ किंवा उपक्रमाचे सदस्य असतील तर अशा कुटुंबातील महिला या योजनेतून वगळल्या जाणार आहेत.

ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. 

याचा लाभ फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळेल. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे. पण कुटुंबातील एक अविवाहित महिला सुद्धा याचा लाभासाठी पात्र राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!