Lakshadweep Tourist Place:- सध्या गुगलच्या दृष्टिकोनातून पाहिले तर संपूर्ण जगामध्ये गुगल वर सर्वाधिक ट्रेंड होत असेल तर ते म्हणजे लक्षद्वीप हे ठिकाण होय. कधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्विपला भेट दिली होती व त्यानंतर संपूर्ण जगामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून सर्वाधिक लक्षद्वीप सर्च केले जाणारे ठिकाण बनले आहे.
एवढेच नाही तर गुगल सर्चमध्ये मागील वीस वर्षाचा रेकॉर्ड मोडला गेल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. पंतप्रधानांनी 2 जानेवारीला केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्विपला भेट दिली. जर आपण या तुलनेत भारतातील पर्यटकांचा विचार केला तर जास्त करून मालदीवला भेट देतात.

परंतु आता पंतप्रधानांच्या लक्षद्वीप भेटीनंतर मात्र गुगलवर सर्वाधिक ट्रेडिंग डेस्टिनेशन ठरले आहे. त्या अनुषंगाने या लेखामध्ये आपण लक्षद्विपला कसे जाता येते? जाण्यासाठी काय तिकीट दर आहे? काही परमिशन लागते का? इत्यादी विषयी माहिती घेणार आहोत.
लक्षद्विपची थोडक्यात ओळख
लक्षद्वीप हे 36 बेटांचा समूह असलेले बेट असून या ठिकाणी पोहोचणे सध्या तरी सोपे नाही. जर आपण लक्षद्वीपची लोकसंख्या पाहिली तर ती साधारणपणे 65 हजार इतकी आहे. या ठिकाणी प्रामुख्याने आदिवासी लोकसंख्या 95% च्या आसपास असून हे लोक अनेक शतकांपासून सागरी सीमा व प्राचीन संस्कृतीचे देखील रक्षक आहेत.
त्यांच्या सुरक्षा करिता या केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रवेश व निवास प्रतिबंधक नियम 1967 लागू करण्यात आला आहे. त्यामुळे येथे जर पर्यटनासाठी जायचे असेल तर अगोदर इनर लाईन परमिट घेणे गरजेचे आहे.
परंतु या इनरलाइन परमिट मधून लक्षद्विपला काम करणारे मजूर, सशस्त्र दल आणि त्यांच्या कुटुंबियांना मात्र यामधून सवलत देण्यात आलेली आहे. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रकल्पांवर काम सुरू असून काही समुद्रकिनारे नव्याने तयार होत आहेत.
लक्षद्विपला विमानाने जायचे तर कसे जाता येईल?
समजा लक्षद्वीप या ठिकाणी विमानाच्या माध्यमातून प्रवास करायचा असेल तर सध्या कोचिन- बंगळुरू होऊन विमानसेवा उपलब्ध आहे. जर तुम्ही कोचिन होऊन विमानाचे एका बाजूचे भाडे पाहिले तर ते पाच हजार सहाशे पर्यंत आहे तसेच जायला 90 मिनिटांचा कालावधी लागतो.
कोचिंग होऊन अलायन्स इयरची फ्लाईट असून 90 मिनिटात कोचिनहुन अगत्तीला पोहोचता येते. एवढेच नाही तर बेंगलोर होऊन व्हाया कोचिन ही फ्लाईट असून हिचे भाडे सात ते पंचवीस हजार रुपये आहे. एवढेच नाही तर बांगरम आइसलँड रिसॉर्ट साठी पावसाळ्यामध्ये करावतीसाठी वर्षभर अगत्ती हुन हेलिकॉप्टर सेवा देखील आहे.
जहाजने कसे जाता येते?
तुम्हाला कोचिनहुन लक्षद्विप पर्यंत एमव्ही करावत्ती, अरबी समुद्र, लक्षद्वीप सी, लगुन, कोरल्स,अमिदिवी व एमव्ही मिनीकॉय या ठिकाणी चालतात. जहाजच्या माध्यमातून प्रवास केला तर तो साधारणपणे 14 ते 18 तासांमध्ये पूर्ण होतो. याकरिता जवळपास चार ते आठ हजार रुपये पर्यंत भाडे लागते.
यासाठीचे तिकीट जर तुम्हाला बुक करायचे असेल तर लक्षद्वीप टुरिझमच्या वेबसाईटवरून तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीने बुक करता येते. यामध्ये तुम्हाला पाच दिवसांसाठीचे सागरी टूर पॅकेज घ्यायचे असेल तर मुंबईहून लक्षद्वीप व्हाया कोचीन ट्रीपचे एक तिकीट 39 हजार ते एक लाख 13 हजार प्रतिव्यक्ती इथपर्यंत असते.
फेरी सेवा देखील आहे उपलब्ध
बेंगलोर हून एर्नाकुलम पर्यंत बसने जाता येते व त्या ठिकाणी टॅक्सी घेऊन विलींगटन बेटावर जाता येते. त्यानंतर फेरीतून लक्षद्वीपची राजधानी करावती येथे पोहोचता येते.
या ठिकाणी हॉटेलचे भाडे कसे आहे?
साधारणपणे हॉटेलमध्ये 150 खोल्या असून बहुतांश पर्यटक सायंकाळी परत येतात. हॉटेल्स मध्ये 150 तर होम स्टेमध्ये तीनशे खोल्या उपलब्ध आहेत. बांगरम आयलँड रिसॉर्टमध्ये एका दिवसा करिता सिंगल डबल एसी रूमचे भाडे 18 हजार रुपये पर्यंत असून करावती रिसॉर्ट मध्ये अकरा हजार रुपये इतके भाडे आहे.
लक्षद्वीपला जाण्यासाठी इनर लाईन परमिट आहे आवश्यक
तुम्हाला जर इनर लाईन परमिट आवश्यक असेल तर त्याकरिता लागणारा आवश्यक अर्ज तुम्हाला epermit.utl.gov.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतो. भारतीयांसाठी याकरिता अर्ज शुल्क 50 रुपये इतके लागते. याकरिता तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडून वेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवावे लागते
व आयडी कार्डची प्रत व तीन पासपोर्ट फोटो सोबत ठेवणे गरजेचे आहे. अर्ज व इतर कागदपत्रे घेऊन लक्षद्वीपला यावे लागते व अगत्ती एअरपोर्टवर सर्व प्रकारची कागदपत्रे प्रशासकाला दिल्यानंतर त्या ठिकाणी जाण्याची परवानगी मिळते.