LIC Policy:- गुंतवणुकीसाठी बँका आणि पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना महत्वपूर्ण असतात व या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य गुंतवणूकदारांच्या माध्यमातून दिले जाते. गुंतवणूक करताना गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या गोष्टींना खूप महत्त्व असते व या मुद्द्यांवर बँक आणि पोस्ट ऑफिसच्या योजना विश्वासार्ह अशा असतात.
यासोबतच भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी हा देखील गुंतवणुकीसाठीचा एक गुंतवणूकदारांचा पसंतीचा असा पर्याय आहे. एलआयसीच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या पॉलिसी असून प्रत्येक पॉलिसीचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. यामध्ये गुंतवणूकदाराला अल्पबचतीत चांगला परतावा मिळण्याची संधी मिळते.
त्यामुळे तुम्हाला देखील जर एलआयसीच्या योजनेमध्ये गुंतवणूक करून इन्शुरन्स कव्हर तसेच इतर फायदे मिळवायचे असतील तर एलआयसीच्या अनेक योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकतात.
त्यामुळे या लेखात आपण अशाच एलआयसीच्या एका योजनेबद्दल माहिती घेणार आहोत जी गुंतवणूकदाराला लाइफ कव्हर प्रदान करते व त्यासोबत चांगला परतावा देखील देते. एलआयसीची ही योजना म्हणजे जीवन आनंद पॉलिसी होय. या पॉलिसीची माहिती आपण या लेखात घेऊ.
एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी आहे फायद्याची
एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये लाईफ इन्शुरन्स कव्हर मिळतो व त्यासोबत केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो. एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विमाधारकाला त्याचा प्रीमियम कालावधी पूर्ण झाल्यानंतर देखील विमा संरक्षण मिळत राहते.
ही एक मुदत पॉलिसी असून या माध्यमातून बोनस आणि मृत्यूचे फायदे मिळतातच. परंतु त्यासोबत अतिरिक्त संरक्षणासाठी अपघाती मृत्यू आणि अपंगत्व रायडर सारखे फायदे देखील मिळतात. एकदा पॉलिसी सुरू केली आणि तुम्हाला जर पॉलिसी सरेंडर करायचे असेल तर तुम्ही दोन वर्षांनी करू शकता.
मिळते पाच लाखाचे अतिरिक्त कव्हर
पॉलिसीधारकाचा जर अपघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त कव्हर रक्कम देखील मिळते.
इतकेच नाहीतर एखाद्या अपघातामुळे पॉलिसीधारकाला कायमचे अपंगत्व आल्यास विमा रक्कम हप्त्यांमध्ये भरून नियमित आर्थिक गरजा पूर्ण केल्या जातील यासाठीची योजना देखील या पॉलिसीच्या माध्यमातून सुनिश्चित केली जाते.
काय आहेत एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीचे वैशिष्ट्ये?
ही एक पारंपारिक एडॉवमेंट पॉलिसी असून यामध्ये विमा रक्कम आणि अतिरिक्त बोनस मिळतो. या योजनेच्या माध्यमातून मिळणारा मॅच्युरिटी बेनिफिट सर्व्हायव्हलवर दिला जातो आणि पॉलिसी ऍक्टिव्ह राहते. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम नॉमिनीला दिली जाते.
मिळतो अतिरिक्त टॉप अप कव्हरचा पर्याय
एलआयसीची ही योजना विमाधारकाला आयुष्यभरासाठी त्याच्याकरिता महत्वाची असलेली आर्थिक सुरक्षा देण्याचे काम करते. तुम्ही जो कार्यकाळ निवडला असेल तो संपल्यानंतर एकरकमी रक्कम या माध्यमातून मिळते. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायचे असेल तर 18 ते 50 वर्षाच्या आतील व्यक्ती करू शकतात.
या पॉलिसीचा कालावधी 15 ते 35 वर्षापर्यंतचा आहे. या पॉलिसीची मुळ विमा रक्कम एक लाख रुपये आहे व प्रीमियम रिबेट हा वार्षिक पेमेंटसाठी दोन टक्के व सहामाही करिता एक टक्के इतका आहे. विशेष म्हणजे या पॉलिसीवर तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता व हे कर्ज तुम्हाला पॉलिसी सुरू केल्यानंतर तीन वर्षांनी घेता येते.
प्रत्येक महिन्याला 1358 रुपये जमा करून 35 वर्षात जमा होतील 25 लाख
एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला 1358 रुपये जमा केले तर 35 वर्षात तुम्ही तब्बल 25 लाख रुपये या माध्यमातून जमा करू शकतात. एलआयसीच्या या प्लॅनमध्ये दोन बोनस समाविष्ट आहेत व जात 35 वर्षांमध्ये एकूण तुमचे पाच लाख 70 हजार पाचशे रुपये ठेव रक्कम आणि पाच लाख रुपयांची मूळ विमा रक्कम समाविष्ट असते.
पॉलिसी मॅच्युअर म्हणजेच परिपक्व झाल्यानंतर पॉलिसीधारकाला 8.60 लाखांचा बोनस आणि जमा केलेल्या रकमेव्यतिरिक्त 11.50 लाखांचा अंतिम बोनस मिळण्याचा अधिकार देखील आहे.
पॉलिसी धारकाला जर या बोनस करिता पात्र व्हायचे असेल तर पॉलिसीचे किमान मुदत पंधरा वर्षे असणे गरजेचे आहे. एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये पॉलिसी धारकाला मात्र कर सवलत मिळत नाही.