शिर्डी, मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, पहा….

MADC Recruitment 2023 : पदवीधर उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मध्ये काही रिक्त जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.

या भरतीच्या माध्यमातून पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी राहणार आहे. मात्र या पदासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

दरम्यान आज आपण या भरती प्रक्रिया अंतर्गत कोणत्या आणि किती रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे, यासाठी अर्ज कसा सादर करावा लागणार, अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक कोणती, आवश्यक शैक्षणिक पात्रता काय यांसारख्या एक ना अनेक बाबींची माहिती जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- सावधान ! अवकाळी परत येतोय; ‘या’ भागात पुढील 3 दिवस कोसळणार वादळी पाऊस, तुमच्या भागात कसं राहणार हवामान?

कोणत्या रिक्त पदांसाठी होणार भरती?

वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल), वरिष्ठ लेखा लिपिक या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.

किती जागांसाठी होणार भरती?

वरिष्ठ व्यवस्थापक सिव्हिल आणि वरिष्ठ लेखा लिपिक या पदाच्या प्रत्येकी दोन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्थातच चार रिक्त जागांसाठी ही भरती आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

सूचनेत दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ व्यवस्थापक सिविल या पदासाठी उमेदवार हा वाणिज्य शाखेतील पदवीधर असावा सोबतच उमेदवार इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचा सदस्य असणे अनिवार्य असल्याचे सांगितले गेले आहे.

तसेच वरिष्ठ लेखा लिपिक या पदासाठी कॉमर्स विषयातील पदवीधर पात्र राहणार आहेत. मात्र पदव्युत्तर पदवीधर उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे. सोबतच या पदासाठी बेसिक कम्प्युटर नॉलेज असणे अनिवार्य आहे.

हे पण वाचा :- विद्यार्थ्यांनो तयारीला लागा ! अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला ‘या’ दिवशी होणार सुरुवात, पहा…

किती वेतन मिळणार

वरिष्ठ व्यवस्थापक सिविल या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 15600 ते 39 हजार 100 पर्यंत वेतन राहणार आहे.

तसेच वरिष्ठ लेखा लिपिक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 5 हजार 200 ते 20 हजार 200 दरम्यान वेतन राहणार आहे.

नोकरी कुठे करावी लागणार

निवड झालेल्या उमेदवारांना शिर्डी किंवा मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना यासाठी ऑफलाइन पद्धतीने उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड 8 वा मजला, केंद्र-1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई- 400005 या पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 20 मे 2023 पर्यंत आपला अर्ज सादर करता येणार आहे.

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! सिकंदराबाद-कोल्हापूर रेल्वे गाडीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर; या गाडीला कुठे राहणार थांबे? पहा…..