परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार ! 5 फॉरेन युनिव्हर्सिटीज राज्यातील ‘या’ शहरांमध्ये कॅम्पस स्थापित करणार

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न आता आपल्या राज्यातच पूर्ण होणार आहे. कारण की महाराष्ट्रात जगभरातील 5 नामांकित फॉरेन युनिव्हर्सिटीचे कॅम्पस ओपन होणार आहे. दरम्यान आज आपण याच संदर्भातील डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published on -

Maharashtra Educational News : तुमचेही परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न आहे का? फॉरेन युनिव्हर्सिटी मधून शिक्षण घेऊन तुम्हाला देखील तुमचे करिअर सेट करायचे आहे का ? मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता देशातील विद्यार्थ्यांना मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) जागतिक दर्जाचे शिक्षण मिळणार आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार आहे. याचा फायदा फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच होणार असे नाही तर देशभरातील इतरही विद्यार्थी या ठिकाणी येऊन शिक्षण घेऊ शकतात.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील एज्यु-सिटीमध्ये म्हणजेच मुंबईत कॅम्पस उघडण्यासाठी पाच परदेशी विद्यापीठांना लेटर ऑफ इंटेंट (LOI) देण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ 250 एकरवर ही एज्यु-सिटी बांधली जात आहे.

येथे जगातील 10 मोठ्या विद्यापीठांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. ही घोषणा मुंबईत झालेल्या ‘मुंबई रायझिंग: क्रिएटिंग अ इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ या कार्यक्रमात करण्यात आली, ज्यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि यूजीसीचे अधिकारी देखील उपस्थित होते.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले की आतापर्यंत 9 परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्यास मान्यता मिळाली आहे आणि लवकरच आणखी 6 विद्यापीठे सामील होतील. ते म्हणाले की बहुतेक विद्यापीठे जगातील टॉप 100 रँकिंगमध्ये आहेत. हे सर्व राष्ट्रीय शिक्षण धोरणमुळे शक्य झाले आहे.

खरेतर, परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न, जे तरुण काही कारणास्तव पूर्ण करू शकत नाहीत, त्यांना आता मुंबईतच कमी खर्चात फॉरेन युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधून शिक्षण घेता येणार आहे.

हे शिक्षण परदेशापेक्षा 30टक्क्यांनी स्वस्त असेल. आता आपण कोणत्या पाच परदेशी विद्यापीठांना मुंबईत कॅम्पस सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे याची माहिती पाहणार आहोत.

या पाच परदेशी विद्यापीठांना मिळाली मान्यता 

इन्स्टिट्यूटो युरोपियो डी डिझाइन, इटली : हे युरोपमधील एक प्रीमियम डिझाइन विद्यापीठ आहे. हे जगभरातील नामांकित युनिव्हर्सिटी मध्ये समाविष्ट आहे. या विद्यापीठात विद्यार्थ्यांना फॅशन, उत्पादन डिझाइन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनमधील अभ्यास उपलब्ध करून दिला जाणार आहे.

इलिनॉय युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, यूएसए : आम्ही आपणास सांगू इच्छितो की हे विद्यापीठ भारतात पदवी देणारे पहिले अमेरिकन विद्यापीठ ठरणार आहे. संगणक विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यवसाय या विषयांचे अभ्यासक्रम या विद्यापीठात उपलब्ध होणार अशी माहिती समोर आली आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनायटेड किंग्डम : रसेल ग्रुपचे सदस्य असलेले आघाडीचे संशोधन विद्यापीठ म्हणून ही फॉरेन युनिव्हर्सिटी संपूर्ण जगभरात ख्यातनाम आहे. दरम्यान आता या युनिव्हर्सिटीचे कॅम्पस आपल्या मुंबईत लागणार आहे आणि या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना एआय, सायबरसुरक्षा, व्यवसाय, अर्थशास्त्र आणि सर्जनशीलता या विषयांचे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातील. 

स्कॉटलंडमधील अ‍ॅबरडीन विद्यापीठ : स्कॉटलंडमधील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ म्हणून स्कॉटलंडच्या अबर्डीन विद्यापीठाची ओळख आहे. दरम्यान आता हे स्कॉटिश विद्यापीठ भारतात आपले कॅम्पस ओपन करणार आहे. मुंबईत या विद्यापीठाचे कॅम्पस ओपन केले जाणार असून हे भारतात कॅम्पस उघडणारे पहिले स्कॉटिश विद्यापीठ बनले आहे. 

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाच्या टॉप ग्रुप ऑफ 8 चा भाग असणारे हे विद्यापीठ भारतात कॅम्पस ओपन करणार आहे. या विद्यापीठात विद्यार्थ्यांना विज्ञान, अभियांत्रिकी आणि उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!