शक्तिपीठ महामार्गाच्या अलाइनमेंटमध्ये मोठा बदल ! नव्या अलाइनमेंटला मुख्यमंत्री फडणवीस यांचा ग्रीन सिग्नल

राज्याला लवकरच एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग विकसित केला जाणार असून याच शक्तीपीठ महामार्ग प्रोजेक्ट बाबत आता एक नवीन माहिती समोर आली आहे.

Published on -

Maharashtra Expressway : मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर राज्यात नवा मार्ग विकसित केला जाणार आहे. नागपूर ते गोवा यादरम्यान नवा प्रवेश नियंत्रित मार्ग तयार होणार आहे अन याला शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे आणि या नव्या मार्गाच्या भूसंपादनाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे.

असे असतांना आता शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित अलाइनमेंट म्हणजे आखणीत मोठा बदल करण्यात येणार अशी माहिती समोर आली आहे. प्रकल्पाच्या रिअलाइनमेंटमुळे पर्यावरण संवर्धनासह प्रकल्पाचा खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होणार अशी माहिती समोर येत आहे.

आमदार दीपक केसरकर यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. तसेच याच्या रिअलाइनमेंटला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचेही सांगितले जात आहे. 

या भागात बदलणार अलाइनमेंट

शक्तिपीठ महामार्गाचा अलाइनमेंट आंबोली घाटात बदलण्यात येणार आहे, येथील इको-सेन्सिटिव्ह म्हणजे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग आणि बागायती भाग टाळून केसरी-फणसवडे मार्गाचा वापर करण्यात येणार असल्याचे सुद्धा यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

या नव्या अलाइनमेंटमुळे आता आंबोली घाटात फक्त 10 किमीचा बोगदा तयार केला जाणार आहे. आधी या भागात 30 किमीचा बोगदा तयार करण्यात येणार होता. यामुळे साहजिकच प्रकल्पाच्या खर्चात मोठी बचत होणार आहे अन पर्यावरणावर होणारा परिणामही बऱ्यापैकी टाळला जाणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

कसा असणार शक्तीपीठ महामार्ग ?

वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून या महामार्गाची सुरुवात होणार आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे समाप्ती होईल. हा महामार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाईल आणि यामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास वेगवान होणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी 802 किलोमीटर इतकी राहणार आहे.

हा सहा पदरी महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जाईल. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, धाराशिव, परभणी, बीड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून हा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. हा महामार्ग राज्यातील तीन महत्त्वाच्या शक्तीपीठांना कनेक्ट करणार आहे.

माहूर, तुळजापूर, कोल्हापूर या तीन शक्तिपीठांना हा महामार्ग कनेक्ट करेल. यासोबतच  आंबाजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, कणेरी, पट्टणकडोली, सिद्धरामेश्वर आदमापूर, पत्रादेवी (गोवा) ही ठिकाणे देखील या महामार्गामुळे जोडली जाणार आहेत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!