आनंदाची बातमी ! आता मुंबईतून पुण्याला जाताना लोणावळा खंडाळा घाटातुन जाण्याची गरज नाही, इथं तयार होतोय नवा महामार्ग

Published on -

Maharashtra Expressway : मुंबईतून पुण्याला जायचे असेल तर एका दिवसाचा वेळ जातोच. पण लवकरच मुंबई पुणे प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर मुंबईहून पुण्याला जायचे असले तर लोणावळा खंडाळा घाटातून जावे लागते याशिवाय प्रवाशांना कोणताच पर्याय नाही.

मात्र याच घाटात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरते आणि यामुळे मोठा वेळ वाचतो. पण आता हा प्रवास वेगवान होणार आहे. कारण की आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुळात खंडाळा घाट लागणारच नाही म्हणजेच आता घाटातून प्रवास करण्याची कोणतीच आवश्यकता प्रवाशांना राहणार नाही.

खरे तर मुंबई पुणे एक्सप्रेस वे चा प्रवास वेगवान व्हावा यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला होता आणि आता हा प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करतोय.

मिसिंग लिंक प्रोजेक्ट अंतर्गत सह्याद्रीच्या डोंगरात एक महाकाय पूल तयार होतोय. हा केबल स्टेड पुल असून याची उभारणी आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. अर्थातच या पुलावरून लवकरच वाहतूक सुरू होणार आहे. यामुळे येत्या काही दिवसांनी एक्सप्रेस-वे-मार्गे प्रवास अगदीच वायू वेगाने होईल असं आपण म्हणू शकतो.

मिसींग लिंकमुळे दोन्ही महानगरांमधील अंतर कमी होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन्ही राजधानी मधील अंतर ६ km ने कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई ते पुणे हा प्रवास या नव्या प्रकल्पामुळे जवळपास अर्धा तास लवकर होणार आहे.

प्रकल्पाचे काम कुठंवर पोहचल? 

महाराष्ट्रातील दळणवळण क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवणारा मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील खंडाळा घाटात उभारण्यात आलेला सुमारे १८० मीटर उंच केबल-स्टेड पुल हे या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

अत्यंत दुर्गम आणि आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत उभारण्यात येणारा हा पुल महाराष्ट्रातील सर्वात चॅलेंजिंग प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाअंतर्गत खोपोली एक्झिटपासून लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशांना प्रत्येकी चार मार्गिकांचे दोन भव्य बोगदे बांधण्यात आले आहेत.

यातील सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी ८.८७ किलोमीटर असून दुसरा बोगदा १.६७ किलोमीटर लांबीचा आहे. या दोन्ही बोगद्यांचे तब्बल ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने सुरू आहे.

खंडाळा खोऱ्यातील केबल-स्टेड पुलाच्या बांधकामादरम्यान मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे अडथळे निर्माण झाले होते. मात्र, आता या अडचणींवर मात करत काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेत इतक्या उंचीवर पुल उभारणे हे अभियंत्यांसाठी मोठे तांत्रिक आव्हान ठरले आहे.

१४ किलोमीटर लांबीच्या या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबईहून पुण्याला जाताना खंडाळा घाट टाळता येणार आहे. फक्त लोणावळ्यात प्रवेशासाठीच खंडाळा घाटातून जावे लागणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होऊन वाहतूक कोंडीपासून प्रवाशांची सुटका होणार आहे.

मार्च २०२६ मध्ये हा मार्ग सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, आता नव्या नियोजनानुसार १ मे रोजी हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुखकर होणार असल्याचे चित्र आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News