पुणे, अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दोन महामार्ग प्रकल्पाच्या रुंदीकरणासाठी 6250 कोटी रुपयांची निविदा जाहीर

राज्यातील पुणे, अहिल्या नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रायगड या जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या अशा दोन महामार्ग प्रकल्पांच्या रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान याच प्रकल्पाबाबत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.

Published on -

Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. पुण्यातही अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत तसेच अजूनही काही पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे प्रस्तावित आहेत.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे पुण्यातील दोन महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पांच्या रुंदीकरणासाठी 6250 कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. 

 या प्रकल्पांसाठी जाहीर झाली निविदा 

हडपसर ते यवत आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या महामार्ग प्रकल्पाच्या रुंदीकरणासाठी एम एस आय डी सी म्हणजेच राज्य पायाभूत विकास महामंडळाकडून निविदा जाहीर करण्यात आली आहे. फडणवीस सरकारने या दोन्ही प्रकल्पांत जातीने लक्ष घातले असून हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावे या अनुषंगाने सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य पायाभूत विकास महामंडळाकडून 6250 कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे दोन्ही प्रकल्प दोन स्वतंत्र भागांमध्ये पूर्ण केली जाणार आहेत. यातील हडपसर ते यवत दरम्यानच्या सहा पदरीकरणासाठी 3146.85 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तसेच तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 3123.92 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तळेगाव ते चाकण दरम्यान चार पदरीकरण केले जाणार आहे आणि चाकण ते शिक्रापूर दरम्यान चा रस्ता सहा पदरी होणार आहे.

खरे तर पुणे जिल्ह्यातील हा परिसर औद्योगिक आणि निवासी दृष्टिकोनातून अलीकडील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे आणि यामुळे येथे वाहतूक कोंडीची देखील समस्या भेडसावत आहे. हेच कारण आहे की या दोन्ही महत्त्वाकांक्षी रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

दरम्यान आता या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली असल्याने लवकरात लवकर ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून या प्रकल्पांची कामे सुरू व्हावीत अशी येथील नागरिकांची इच्छा आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्यातील या संबंधित भागातील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. हा प्रकल्प फक्त पुणे जिल्ह्यासाठीच महत्त्वाचा आहे असे नाही तर याचा लाभ अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, रायगड या जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!